MI vs DC, IPL 2024 : `प्रत्येकाने चांगली फलंदाजी केली पण...`, पहिल्या विजयानंतर हार्दिक पांड्या नेमकं म्हणाला तरी काय?
IPL 2024 MI vs DC : अखेर मुंबई इंडियन्सने विजयाचा श्रीगणेशा केलाच. आयपीएलच्या 2024 च्या सामन्यात पहिला विजय मिळाल्यानंतर विजयाचे श्रेय नेमकं हार्दिक पांड्याने कोणाला दिलं आहे.
Hardik Pandya MI vs DC : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सने या हंगामातील पहिला विजय मिळला आहे. या सामन्यात मुंबईच्या जवळपास सर्वच खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 234 धावांचे आव्हान दिले होते. तर दुसरीकडे रोहित शर्माची आक्रमक सुरूवात अन् रोमॅरियो शेफर्ड (Romario Shepherd) याची वादळी फिनिशिंग यामुळे धावांचा मुंबईला डोंगर उभरता आला. या सामन्यात कॅप्टन पांड्याने (Hardik Pandya) संयमी खेळी केली. मात्र, मुंबईसाठी ही खेळी पुरेशी नव्हती. या विजयानंतर हार्दिक पांड्याने प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईच्या वानखेडे मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) यांच्यात 20 वा आयपीएल सामना खेळला गेला.या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पहिला विजय मिळवला. या सामन्याच्या विजयानंतर हार्दिक पांड्याने एकाच खेळाडूच नाव घेत म्हणाला, प्रत्येकाला एक विजयी कर्णधार बनणे आवडतं, ही माझ्यासाठी खास गोष्ट आहे. आम्ही खूप मेहनत घेतली. मानसिकता बदलण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आम्ही संघात काही महत्त्वाचे बदल केले. त्यानंतर संघ व्यवस्थित स्थिरस्थावर व्हायला हवा, असे मला वाटते. पहिल्या तीन सामन्यात आमचा पराभव झाला. पण आता मुंबई इंडियन्स पुनरागमन करेल असा विश्वास सर्वांना होता. आता आणखी एक विजय मिळवला तर संघाच गाडी रुळावर येईल. याची सर्वांना कल्पना असेल.
तसेच पुढे हार्दिक पांड्या म्हणाला, "प्रत्येकाने चांगली फलंदाजी केली. फक्त आम्हाला विजयाची लय हव होती त्या संधीची प्रत्येकजण वाट पाहत होता. आजच्या सामन्यात सर्वांनी चांगली फलंदाजी केली. पण रोमॅरियो शेफर्डचं नाव मी आवर्जुन घेईन. कारण त्याच्यामुळे आम्हाला हा विजय मिळला आहे, असं मला वाटतं. दोन्ही संघाची फलंदाजी पाहिला तर शेफर्डने अखेरच्या षटकात केलेली फलंदाडी हाच फरत जाणवेल. शेफर्डटी धडाकेबाज खेळीमुळेच विजय मिळवू शकलो.
दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवानंतर पंत काय म्हणाला?
पॉवर प्लेमध्ये आम्हाला अधिक धावा काढायला हव्या होत्या . आम्ही वेगानं धावा करण्यात प्रयत्न केला. पण 15-16 धावा झाल्यानंतर दडपण वाढेल आणि त्यावेळी धावा काढणे कठीण झाले. एक षटकाराचा खेळ फिरवला जाऊ शकतो, असे पंतने म्हणतं शेफर्डचे कौतुक केले. पॉवर प्लेमध्ये फलंदाजी आणि डेथ बॉलिंगमध्ये सुधारण्यासाठी आम्ही आणखीन चांगला प्रयत्न करु, असं पंतने सांगितले.