लंडन : माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला टीम इंडियाचा सर्वात मोठा फिनिशर मानले जाते. धोनीकडून टिप्स घेऊन बांगलादेश विरूद्ध सराव सामन्यात ५४ चेंडूत ८० धावांची धडाकेबाज खेळी करणारा हार्दिक पांड्या भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फिनिशरची भूमिका वढविण्यास उत्सुक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पांड्याने सांगितले की,  हे अवघड काम करणे मला खूप आवडते. फिनिशरची भूमिका मिळणे खूप चांगले आहे. हे सोपे नाही. तुम्हांला परिस्थितीनुसार खेळावे लागते. पण या खेळीने माझा खूप आत्मविश्वास वाढला आहे. असे करणे मला खूप आवडते. 


पांड्या ३३ व्या षटकात क्रिजवर आला त्याने सुरूवातीला टीकून खेळ केला पण नंतर त्याने नैसर्गिक शॉट खेळले. पांड्या म्हणाला, इंग्लडमध्ये येऊन लगेच नैसर्गिक खेळ खेळणे अवघड असते. परिस्थितीनुसार खेळणे गरजेचे आहे. मी फलंदाजीसाठी आलो तेव्हा आकाशात ढग दाटले होते, त्यामुळे मी थोडा वेळ घेतला. 


पाकिस्तानशी मॅचबद्दल बोलला पांड्या...


भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिला सामना हा पाकिस्तान विरूद्ध होणार आहे. त्यामुळे बर्मिंघममध्ये खेळण्यात येणाऱ्या सामन्यात आमच्यावर कोणताही दबाव नाही. या सामन्याला आम्ही इतर  सामन्याप्रमाणे घेतले आहे. आम्ही आमचा सर्वश्रेष्ठ खेळ करणार आहे.