मुंबई : पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातने 8 विकेट्सनं सामना गमवला. कर्णधार हार्दिक पांड्या या सामन्यात सर्वात फ्लॉप ठरला आहे. पांड्या 7 बॉलमध्ये 1 धावा काढून बाद झाला. ऋषी धवनने हार्दिक पांड्याला कॅच आऊट केलं. गुजरातचा हा आतापर्यंतच्या सामन्यात दुसरा पराभव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्लॉप ठरला पांड्या
पंजाब विरुद्ध सामन्यात हार्दिक पांड्या फ्लॉप ठरला. त्यानंतर सोशल मीडियावर पांड्याला ट्रोल करण्यात आलं. पंजाबने 144 धावांचं आव्हान दिलं. मात्र गुजरातला हे आव्हान पूर्ण करता आलं नाही. पंजाबने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. 



ट्रोलर्सच्या टार्गेटवर पांड्या
गुजरात टायटन्सकडून अत्यंत वाईट कामगिरीची चाहत्यांना अपेक्षा नव्हती. त्यानंतर ट्रोलर्सनी याचा राग हार्दिक पांड्यावर काढल्याचं पाहायला मिळालं. गुजरात टायटन्सचे सध्या 16 गुण आहेत. 


IPL 2022 मध्ये, गुजरात टायटन्सने 9 पैकी 8 सामने जिंकले आहेत. गुजरात टायटन्सच्या केवळ एका फलंदाजाला अर्धशतक करता आलं. गुजरात टायटन्ससाठी साई सुदर्शनने सर्वाधिक 64 धावा केल्या.


काही ट्रोलर्सनी तर हार्दिक पांड्याला माज चढलाय, गर्व असल्याचं म्हटलं आहे. गर्वाचं घर खाली असंही ट्रोलर्सनी म्हटलं आहे. हार्दिक पांड्यावर लोकांनी टीका केली आहे.