Hardik Pandya on India vs Australia 1st T20I:  तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी मिळवली आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला येत भारतीय संघाने 6 गडी गमवत 208 धावा केल्या आणि विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि केएल राहुल (KL Rahul) या दोघांनी अर्धशतकं झळकावली होती. मात्र हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 19.2 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने (India Vs Australia) मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पराभवानंतर हार्दिक पांड्यानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माझा सध्या चांगला फॉर्म आहे, पण माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे की मी चांगल्या दिवसातही चांगले कसे होऊ शकतो. माझ्याकडे ज्या प्रकारचा करिअर आलेख आहे, मी माझ्या कामगिरीला फारसे महत्त्व देत नाही, मग ते यश असो वा अपयश. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात माझी कामगिरी चांगली झाली. पुढील सामन्यात ते मला लक्ष्य करू शकतात आणि मला एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. यापुढे अधिक सावध राहण्याची गरज आहे.', असं हार्दीक पांड्यानं सांगितलं. मोहालीत खेळल्या गेलेल्या या टी-20 सामन्यात हार्दिक पंड्याने फलंदाजीत दमदार कामगिरी केली. त्याने 30 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या. 


Team India चा ढासळता फॉर्म पाहता Coach राहुल द्रविडने उचललं पाऊल, बीसीसीआयला स्पष्टच सांगितलं की...


'मैदानात दव नव्हते. त्यांनी चांगली फलंदाजी केली आणि विजयाचे श्रेय त्यांना द्यावे लागेल. गोलंदाजीत आम्ही आमची योजना अंमलात आणू शकलो नाही. आम्ही का हरलो याचे एकच कारण तुम्ही देऊ शकत नाही. हा सामना आहे, खेळ आहे, द्विपक्षीय मालिका आहे. आम्हाला आणखी दोन सामने खेळायचे आहेत आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू.", असं हार्दिक पांड्याने पुढे सांगितलं. दुसरा टी-20 सामना 23 सप्टेंबर रोजी नागपुरात होणार आहे.