मुंबई : गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने गुरुवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात उत्तम कामगिरी केली. त्याने त्याच्या कामगिरीच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकली. फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच फिल्डींगमध्येही अप्रतिम कामगिरी दाखवणाऱ्या हार्दिकने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन रन आऊट केलं. मात्र यावेळी पंड्याने केलेल्या थ्रोमुळे स्टंप तुटल्याचं समोर आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकी फर्ग्युसनच्या आठव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर सॅमसनने मिड-ऑफच्या दिशेने शॉट खेळून रन घेण्याचा प्रयत्न केला पण हार्दिकने बॉल पटकन अडवला. रन आऊटची संधी साधत त्याने रॉकेट थ्रोने स्टंपवर फेकला. हार्दिकचा थ्रो इतका वेगवान होता की, मधला स्टंप तुटला. त्यामुळे अंपायरने काही काळा सामना थांबवला होता



राजस्थानचा कर्णधार सॅमसनने 11 बॉल्समध्ये एका सिक्सच्या मदतीने केवळ 11 रन्स केले. तर गोलंदाजीत जेम्स नीशमला महत्त्वपूर्ण विकेट हार्दिकने मिळवून दिली. हार्दिकने फलंदाजीत चमक दाखवत 52 बॉल्समध्ये आठ चौकार आणि चार सिक्सच्या मदतीने 87 रन्सची तुफानी खेळी केली.


गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 37 रन्सने पराभव करत चौथा विजय नोंदवला. यासह गुजरातने पॉईंट्स टेबलने अव्वल स्थान पटकावलंय. या सामन्यात गुजरातच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. गुजरातच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. गुजरातकडून यश दयाल आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतले.