Hardik Pandya In Mumbai Indians : आगामी आयपीएल हंगामापूर्वी दुबईमध्ये (IPL 2024 Auction) लिलाव 19 डिसेंबरला होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये दुखापतीमुळे बाहेर पडलेला हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. पण तो पुढील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएल ट्रेड विन्डोमध्ये हार्दिकला आपल्या संघात सामील करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच आता खिशात 50 लाख असताना एमआय पांड्यावर 15 कोटी खर्च कसा करणार? असा सवाल विचारला जातोय. मुंबई गुजरातसोबत (Gujarat Titans) ऑल कॅश ट्रेड करेल, अशी चर्चा आहे. मात्र, ऑल कॅश ट्रेड (all cash trade) असतो तरी काय? पाहुया...


ऑल कॅश ट्रेड कसा असतो?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये सध्या फक्त 50 लाख रुपयांची रक्कम शिल्लक आहे. याचा अर्थ असा की आता मुंबई इंडियन्स यंदाच्या लिलावात मोठी बोली लावू शकणार नाही. पांड्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सकडे एकच पर्याय आहे. तो म्हणजे, ऑल कॅश ट्रेड... एखाद्या खेळाडूला संघात सामील करून घेयचं असेल तर संपूर्ण व्यवहार रोख रकमेत करावा लागतो. त्याला ऑल कॅश ट्रेड असं म्हणतात. याचा अर्थ असा की मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सला 15 कोटी रुपये रोख रकमेत देणार आहे. त्यामुळे हा व्यवहार आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा प्लेयर ट्रेड असेल.


आणखी वाचा - IPL 2024 Auction : धोनीचा नवा डाव! 16 कोटीच्या बेन स्टोक्सच्या जागी 'या' तीन खेळाडूंचं नाव चर्चेत


आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सकडे यंदा फक्त 50 लाख रुपये शिल्लक आहेत. तर लिलावापूर्वी प्रत्येक संघांला 5 कोटी वाढवता येणार आहे. त्यामुळे  आता मुंबई इंडियन्सकडे 5.50 कोटी यंदाच्या आयपीएल लिलावापूर्वी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे मुंबई कोणत्या खेळाडूंवर डाव लावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मुंबईने अद्याप जोफ्रा आर्चरला सोडण्याचा निर्णय घेतला आहे की नाही याची पुष्टी केलेली नाही. मुंबईने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज 8 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. मात्र, त्याच्या कामगिरीवर मुंबई नाराज असल्याचं बोललं जातंय.


कॅप्टन कोण? रोहित की पांड्या?


गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक मुंबईत सामील झाल्यास, तो रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार का? असा सवाल विचारला जात आहे. आगामी वर्ल्ड कप 2024 चा विचार करता मुंबई इंडियन्सचा हा निर्णय सर्वात महत्त्वाचा असणार आहे. सध्या काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. बीसीसीआय अंतिम ट्रेडिंग यादी अधिकृतपणे जाहीर करेल तेव्हाच चित्र स्पष्ट होणार आहे.