Hardik Pandya नाही बनणार टी-20 चा कर्णधार? Rahul Dravid यांच्या वक्तव्याने खळबळ
हार्दिक पंड्या ला टी-20 सामन्यांच्या नेतृत्वाची धुरा देणयात आली. ज्यानंतर 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिकडे सोपवली जाणार असल्याचे अंदाज बांधण्यात आले.
Rahul Dravid on Hardik Pandya : टी-20 वर्ल्डकप 2022 (T-20 world cup) मध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियामध्ये (Team India) अनेक बदला होताना दिसले. यामध्ये खासकरून तरूण खेळाडूंना संधी देण्यात आली. आतापर्यंत न्यूझीलंड असेल किंवा श्रीलंका यांच्याविरूद्धच्या टी-20 सीरिजमध्ये (T-20 Series) हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टीमचं नेतृत्व करत होता. ज्यानंतर हार्दिकच टी-20 सीरिजचा कायमस्वरूपी कर्णधार असल्याची एकच चर्चा सुरु झाली. मात्र अशातच टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी (Rahul Dravid) यांनी मोठं विधान केलं आहे.
यंदाच्या वर्षी भारतात वनडे वर्ल्डकपचं आयोजन केलं जाणार आहे. यासाठी भारतीय टीममधील अनेक दिग्गज खेळाडू 50 ओव्हरच्या सामन्यांकडे अधिक लक्ष देतायत. परिणामी टी-20 सामने हे खेळाडू खेळताना दिसत नाहीत. टी-20 वर्ल्डकपनंतर भारताने न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरूद्ध टी-20 सामने खेळले, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीला संधी दिली गेली नाही.
या परिस्थितीत हार्दिक पंड्या ला टी-20 सामन्यांच्या नेतृत्वाची धुरा देणयात आली. ज्यानंतर 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिकडे सोपवली जाणार असल्याचे अंदाज बांधण्यात आले. या चर्चा सुरु असतानाच राहुल द्रविड यांच्या वक्तव्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे.
नुकत्याच झालेल्या एका प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड म्हणाले, मला टीम इंडियाच्या स्प्लिट कॅप्टन्सीबाबत काही माहिती नाहीये.
राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या या विधानावरून सध्यातरी हार्दिकला कर्णधारपद सोपवण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट होतंय.
कर्णधार म्हणून Hardik Pandya चा रेकॉर्ड उत्तम
IPL 2022 चा विजेता झाल्यानंतर हार्दिक पांड्याकडे टी-20 चं कर्णधार म्हणून पाहिलं जात होतं. त्याने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सच्या टीमला विजेतेपद मिळवून दिलं होतं. हार्दिकने आतापर्यंत 8 सामन्यात भारताची कमान सांभाळली असून 7 सामन्यात त्याने विजय मिळवला.