Harish Salve Vinesh Phogat: विनेश फोगाट... मागील काही दिवसांपासून हेच नाव देशवासियांमध्ये चर्चेत आलं असून, विनेशच्या कामगिरीला संपूर्ण देशानं सलाम केला आहे. अनेक संघर्षमय अडथळे ओलांडल्यानंतर या कुस्तीपटूनं पॅरिसमध्ये सुरु असणाऱ्या ऑलिम्पिक खेळांमध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटातील कुस्ती स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठली होती. पण, सामन्याच्या काही तासांआधीच नियमांनुसार करण्यात आलेल्या वजनामध्ये विनेशचं वजन 100 किलोंनी जास्त भरलं आणि तिला या स्पर्धेत अपात्र ठरवण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनेश, तिची संपूर्ण टीम आणि भारतीय क्रीडा जगतासह भारताली नागरिकांनाही मोठा धक्का बसला. अंतिम सामन्याआधी वजन अधिक भरत असल्याचं लक्षात येताच विनेश आणि तिच्या संपूर्ण टीमनं प्रचंड मेहनत घेतली, पण अखेर हाती निराशाच आली आणि पदकाच्या आशा मावळल्या. 


आता मात्र याच आशा नव्यानं पल्लवित होताना दिसत असून, विनेश पदकासही पात्र ठरण्याचे संकेत मिळत आहेत. तिच्या पदकाचा निर्णय आता थेट न्यायालय देणार असून, Court of Arbitration for Sports- CAS मध्ये भारताच्या या महिला कुस्तीपटूची बाजू देशातील सर्वाधिक प्रतिष्ठीत आणि विरोधी पक्षाला घाम फोडणारे वकील हरीश साळवे मांडणार आहेत. साळवेंनी विनेशची बाजू मांडण्यास तयारी दर्शवमं ही मोठी दिलासादायक बाब ठरत आहे. 


हेसुद्धा वाचा : अपात्र ठरली तरी 4 कोटी! चॅम्पियनच्या सर्व सुविधा मिळणार; सरकारची विनेशसंदर्भात सर्वात मोठी घोषणा


 


IOA अर्थात भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या वतीनं CAS कडे विनेशची बाजू मांडण्यासाठी वकीलांची व्यवस्था करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला होता. विनेशच्या वतीनं दोन प्रकरणी अपात्रतेच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. 


विनेशच्या वतीनं आव्हान देण्यात आलेलं एक प्रकरण म्हणजे तिला दुसऱ्यांना वजन करण्याची परवानगी दिली जाणं अपेक्षित होतं, पण ही याचिका मात्र न्यायालयानं फेटाळली आणि सुवर्णपदकासाठीचा सामना निर्धारित वेळेत पार पडला. विनेशच्या वतीनं दुसऱ्या याचिकेमध्ये रौप्य पदकाची मागणी करण्यात आली होती. ज्यावर CAS कडून या प्रकरणी विचारपूर्वक निर्णय देण्याचे संकेत देण्यात आले. ज्यानंतर लगेचच विनेशची बाजू मांडण्यासाठी वकीलांशी शोधाशोध सुरू झाली आणि हरीश साळवे यांच्यापाशी येऊन हा शोध संपला. हरीश साळवे यांनी आतापर्यंत अनेक कायदेशीर संघर्षांचा निकाल आपल्या बाजूनं अतिशय प्रभावीरित्या वळवण्याची किमया केल्यामुळं आता ते विनेशलाही न्याय देतील अशीच अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे.