नवी दिल्ली : इंग्लंडविरूद्ध खेळल्या गेलेल्या टी 20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये अनुभवी बॅट्समन मिताली राजला बाहेर ठेवण्याल्याने भारतीय कॅप्टन हरमनप्रीत कौरवर  चहुबाजुने टीका होतेयं. क्रिकेट जाणकारांनंतर मिताली राजची मॅनेजर अनीशा गुप्ताने एका ट्वीटमधून हरमनप्रीतचा समाचार घेत तिला अपरिपक्व, खोटारडी आणि चलाख म्हटलंय. अनीशाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, भारतीय टीम खेळावर नाही तर राजकारणावर विश्वास ठेवते हे दुर्देवी आहे. भारत विरूद्ध आयरलॅंड सामन्यात मिताली राजचा अनुभव किती कामी आला हे माहित असूनही हरमनप्रीत जी अपरिपक्व, खोटारडी आणि चलाख आहे, तिला खुश करण्यासाठी मितालीने तिला तिच्या मनासारख करू दिलं. एका वेगळ्या अकाऊंटवरून हे ट्वीट करण्यात आलं होतं जे अकाऊंट काही वेळात डिलीट करण्यात आलं. 


खूप मोठ राजकारण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हा ट्वीट तु केलायस का ?' असा प्रश्न 'ईएसपीएनक्रिकइंफो' वेबसाईटने अनीशाला केला. तेव्हा ती आपल्या वक्तव्यावर कायम राहिलेली दिसली. काहीवेळानंतर तिचं हे अकाऊंट डिलीट झालेलं दिसलं. 'मला माहित नाही आत नक्की काय चाललंय पण मॅच प्रसारण सुरू आहे, आम्ही कोण चांगला खेळ करतंय आणि कोण नाही हे पाहतोयं.


चांगल प्रदर्शन करूनही मितालीसोबत असं का होतंय ? यामागे खूप मोठ राजकारण असून ते पाहण्याची गरज असल्याचे' अनिशाचा हवाला देत या वेबसाईटने लिहिलंय.


पश्चाताप नाही 


'तु केलेल्या ट्विटचा तुला पश्चताप होतोय का ?' असा प्रश्न देखील तिला विचारण्यात आला. 'मी खूप रागात असेन...पण ही बाब खऱ्यातून आली आहे कारण मी खोट्यासोबत उभी राहू शकत नाही. एकाची बाजु घेतली जात असल्याच साफ दिसतंय आणि ते जाहीर आहे.' असं अनिशाने सांगितलं.


भारताला ही मॅच गमवावी लागली आणि पहिल्यांदाच टी 20 विश्व चषक जिंकण्याचं स्वप्न तुटलं.