नवी दिल्ली : महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आपल्या बॅटींगने धमाका करणारी टीम इंडियाची खेळाडू हरमनप्रीत कौर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हरमनप्रीत कौरने महिला बिग बॅश लीगमध्ये आपल्या शानदार कॅचने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. 


न विसरता येणारी कॅच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिडनी थंडर्सकडून खेळणा-या हरमनप्रीतने बिग बॅशमध्ये आपल्या बॅटने अजून काही करिश्मा केला नाही. पण तिने तिच्या शानदार फिल्डींगने सर्वांनाच अचंबित केले आहे. हरमनप्रीतने शनिवारी झालेल्या सामन्यात एक अशी कॅच घेतली जी बराच काळ सर्वांच्याच लक्षात राहिल. 


हरमनप्रीत ८ रन्सवर आऊट


मेलबर्न रेनेगेड्स आणि सिडनी थंडर्सच्या झालेल्या सामन्यत सिडनी थंडर्सने पहिले बॅटींग करत ६ विकेटच्या नुकसानावर २०० रन्स केलेत. या सामन्यात हरमनप्रीत केवळ ८ रन्सच्या स्कोरवर रनआऊट झाली. त्यानंतर नाओमी स्टालेनबर्ग (३८) आणि निकॉला केरी(४७) यांनी शानदार खेळी करत स्कोर २०० पर्यंत पोहोचवला. 


१ बॉलमध्ये १२ रन्सची गरज



सिडनी थंडर्सला हा सामना जिंकण्यासाठी १ बॉलमध्ये १२ रन्सची गरज होती. गोलंदाजीची जबाबदारी सारा टेलरच्या हाती होती. स्ट्राईकवर मेलबर्नची कर्णधार एमी सॅटरथवेट होती. 


एमीने बॉल हवेत मारला आणि हरमनप्रीतने शानदार पद्धतीने ही कॅच पकडली. आधी सर्वांना वाटलं की, एमी सुरक्षीत आहे, पण अचानक हरमनप्रीत कौर तिथे आली आणि शरीराला स्ट्रेच करत तिने कॅच घेतली. यासोबतच तिच्या टीमने हा सामना ११ रन्सने जिंकला.