Harmanpreet Kaur : उराशी बाळगलेलं स्वप्न अन् सेमीफायनलचा पराभव, अंजूम दिसताच हरमनप्रीत ढसाढसा रडली, पाहा Video
Harmanpreet Kaur VIDEO : सामना गमावल्यानंतर हरमनप्रीतचा आणखी एक व्हिडिओ सध्या शेअर केला जातोय. ज्यामध्ये ढसाढसा रडताना (Harmanpreet Kaur bursts into tears) दिसत आहे.
Harmanpreet Kaur IND vs AUS : केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या रोमांचक सेमीफायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा (India vs Australia) 5 धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड कप (Women's T20 World Cup 2023) घेऊन येण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं आहे. कॅप्टन हरमनप्रीत कौरने या सामन्यात जिवाचं रान केलं. हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) सेमीफायनलच्या सामन्यात कॅन्टन इनिंग खेळली. मात्र, टीम इंडियाला सामना जिंकता आला नाही. (Harmanpreet Kaur Viral Video after loosing India against Australia in T20 World Cup 2023)
हरमनप्रीत कौरने 34 बॉल्समध्ये 52 रन्सची खेळी केली. या खेळीमध्ये 6 फोर आणि एका सिक्सचा समावेश आहे. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) सर्वाधिक धावा केल्या. मात्र, एक चूक आणि सामना फिरला. धोनी ज्या पद्धतीने न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कप सामन्यात रन आऊट झाला. तसंच हरमनप्रीत देखील रनआऊट झाली. त्याचा व्हिडिओ शेअर केला जातोय. हरमनप्रीतचा आणखी एक व्हिडिओ सध्या शेअर केला जातोय. ज्यामध्ये ढसाढसा रडताना (Harmanpreet Kaur bursts into tears) दिसत आहे.
पाहा Video -
काय म्हणाली Harmanpreet Kaur ?
ज्यावेळी पोस्टमॅच प्रेझेंटेशन (Postmatch presentation) सुरू होतं. त्यावेळी हरमनप्रित कौरने डोळ्यांवर गॉगल घातला होता. त्यावेळी तिला कारण विचारलं गेलं. माझ्या देशाने मला रडताना पाहावं, असं मला वाटत नाही, म्हणूनच मी हा चष्मा घालून आले आहे, असं स्पष्टीकरण हरमनप्रीतने यावेळी दिलंय.
दरम्यान, आम्ही आमचा खेळ सुधारू आणि देशाला पुन्हा असं निराश होऊ देणार नाही, असं वचन हरमनप्रीत कौरने देशवासियांना यावेळी दिला आहे. त्याआधी माजी कॅप्टन अंजूम चोप्राशी (Anjum Chopra) बोलत असताना हरमनप्रीतला अश्रू अनावर (Harmanpreet Kaur Cried) झाले अन् ती ढसाढसा रडल्याचं दिसून आले. त्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Video Viral) होताना दिसत आहे.