Pakistan vs England 1st Test :​  मुलतानमध्ये पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला टेस्ट सामना खेळवला जात असून यात इंग्लंडचे फलंदाज जो रूट आणि हॅरी ब्रुकने आपल्या विस्फोटक गोलंदाजीने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. मुलतान क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामना खेळवला जात असून यात हॅरी ब्रुक आणि जो रूट यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना घाम फोडत आपापली दुहेरी शतक लगावली. यासोबतच जो रूट आणि हॅरी ब्रुकने इतिहास रचला. 


मोडला 39 वर्षांचा महारेकॉर्ड : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॅरी ब्रुक आणि जो रूट यांनी मिळून टेस्ट क्रिकेटमध्ये  39 वर्षांपूर्वींचा रेकॉर्ड मोडला. 1985 नंतर हा पहिलाच प्रसंग होता जिथे इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी एकाच टेस्ट इनिंगमध्ये त्यांनी आपापली दुहेरी शतक पूर्ण केली. लंच ब्रेक पर्यंत जो रूटने 368 बॉलमध्ये 259 धावा केल्या. तर हॅरी ब्रुकने 257 बॉलमध्ये 218 धावा करून नाबाद खेळी केली. हॅरी ब्रूक आणि जो रूट यांनी चौथ्या विकेटसाठी 409 धावांची पार्टनरशिप केली. 


हेही वाचा : Women's T20 World Cup 2024 चा सर्वात मोठा स्कोअर, श्रीलंकेला पराभूत करत भारताने बदललं सेमी फायनलचं समीकरण


जो रूट आणि हॅरी ब्रूकने रचला इतिहास : 


जो रूट आणि हॅरी ब्रूकने एक टेस्ट इनिंग दरम्यान आपापली द्विशतके पूर्ण करून इतिहास रचला. यापूर्वी अशी कामगिरी टेस्ट क्रिकेटमध्ये 39 वर्षांपूर्वी म्हणजेच 1985 मध्ये झाली होती. जानेवारी 1985 मध्ये, भारताविरुद्ध चेन्नई टेस्ट खेळताना इंग्लंडचे फलंदाज माईक गॅटिंग आणि ग्रॅमी फॉलर यांनी त्याच टेस्ट इनिंगमध्ये आपापली द्विशतके पूर्ण केली होती. माइक गॅटिंगने 207 धावा केल्या होत्या. तर ग्रॅमी फॉलरने 201 धावांची खेळी केली होती. या टेस्ट सामन्यात इंग्लंडने भारताचा 9 विकेट्स राखून पराभव केला.


विदेशातील सर्वात मोठी पार्टनरशिप : 


पाकिस्तान विरुद्धच्या मुलतान टेस्ट सामन्यात खेळताना हॅरी ब्रूक आणि जो रूट यांनी चौथ्या विकेटसाठी 409 धावांची पार्टनरशिप केली. या दोन्ही फलंदाजांनी परदेशात खेळल्या गेलेल्या टेस्ट सामन्यांमध्ये कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी पार्टनरशिप करण्याचा विक्रम केला आहे. हॅरी ब्रूक आणि जो रूट यांनी जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांचा 399 धावांचा विक्रमही मोडला, जो या दोन फलंदाजांनी 2016 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सामन्यात केला होता.