Harry Brook takes a dig at Indian fans : शुक्रवारी कोलकाता नाईड रायडर्स (Kolkata Knight Riders) विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यामध्ये सामना रंगला होता. हा सामना जिंकून हैदराबादने यंदाच्या सिझनमध्ये दुसऱ्या विजयाची नोंद केली. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत 229 रन्सचं लक्ष्य केकेआर समोर ठेवलं होतं. यावेळी एसआरएचचा फलंदाज हॅरी ब्रूक (Harry Brook) च्या शतकी खेळीच्या जोरावर इतका मोठा स्कोर उभा केला. दरम्यान या शतकानंतर हॅरी ब्रूकने भारतीय चाहत्यांवर (Indian fans) टीका केली आहे. 


आयपीएलच्या सुरुवातीला हॅरी ब्रूक ठरलेला फेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2023 च्या यंदाच्या या सिझनमधील प्रथम शतक हॅरी ब्रूकने लगावलं. हैदराबादच्या टीमने हॅरीला 13.25 कोटी रूपयांना खरेदी केलं होतं. इतकी मोठी रक्कम मोजून देखील हैदराबादच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये ब्रूक पूर्णपणे फेल गेला होता. यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावरून टीकाही करण्यात आल्या. मात्र पहिलं शतक ठोकल्यानंतर चाहत्यांनी त्याचं कौतुक केलंय. दरम्यान याच गोष्टीवरून ब्रूकने भारतीय चाहत्यांवर टीका केलीये. 


काय म्हणाला हॅरी ब्रूक?


कोलकात्याविरूद्धच्या सामन्यात ब्रूकने शतक झळकावल्यानंतर त्याल मॅन ऑफ मॅचचा खिताब देण्यात आला. यावेळी त्याने भारतीय चाहत्यांवर आपला संताप व्यक्त केलाय. ब्रूक म्हणाला, ज्यावेळी तुम्ही सोशल मीडिया उघडता, तेव्हा लोकं तुम्हाला बकवास म्हणतात. मात्र माझ्या या खेळीनंतर असे अनेक भारतीय चाहते आहेत, जे म्हणतील, खूप चांगला खेळ केला. हेच लोकं काही दिवसांपूर्वी मला वाईट बोलत होते. पण मला आनंद आहे की, मी यांचं तोंड बंद करू शकलो.


केकेआरविरूद्धच्या सामन्यात ब्रूकने तुफान फलंदाजी केली. यावेळी त्याने 12 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने अवघ्या 55 बॉल्समध्ये स्वतःचं शतक पूर्ण केलं. सामन्यानंतर बोलताना ब्रूक म्हणाला की, "मी थोडासा तणावात होतो, मात्र एक गोष्टी चांगली म्हणजे आम्ही हा सामना जिंकलो. टी-20 फॉर्मेटमध्ये फलंदाजी करणं सोपं असतं, मात्र मी कोणत्याही फॉर्मेटमध्ये फलंदाजी करण्यासाठी खूश असतो."


सनरायझर्सचा सलग दुसरा विजय


कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर हैदराबादने कोलकाताचा 23 रन्सने पराभव केला. हैदराबादने कोलकातासमोर 229 रन्सचं आव्हान दिलं होतं. हे लक्ष्य गाठताना केकेआरच्या नाकीनऊ आल्या. अखेरच्या ओव्हरला कोलकाताला 32 रन्सची गरज होती. शेवटी हैदराबादने हा सामना जिंकला. हा हैदराबादचा दुसरा विजय होता.