मुंबई : टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल अनेकदा त्याच्या गोलंदाजीऐवजी अनेकदा इतर खेळाडूंशी मस्ती करताना दिसतोय. दरम्यान, बीसीसीआयने आपल्या अधिकृत अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये युझवेंद्र चहल अर्शदीप सिंग, दीपक हुडा आणि हर्षल पटेल यांच्याशी मस्ती करताना दिसतोय. त्याने या खेळाडूंची मजेदार मुलाखत घेतली. अखेर, या मुलाखतीत त्याने या खेळाडूंशी काही संवाद साधला


चहलने हर्षलशी केली मस्ती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकपच्या तयारीदरम्यान, युझवेंद्र चहलची ही मुलाखत अनेकांना आवडलीये. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत अर्शदीप सिंह आणि दीपक हुडा दिसतोय. दुसरीकडे चहलसोबतच वेगवान गोलंदाज हर्षल पटेलही या मुलाखतीत सहभागी झाला होता. या व्हिडिओमध्ये युझी तिन्ही स्टार खेळाडूंसोबत मस्ती करताना दिसला. 


युझवेंद्र चहल हा सर्वसाधारणपणे मैदानात आपल्या स्पिनने फलंदाजांना थक्क करताना दिसतो. त्याचवेळी, नुकत्याच आलेल्या एका व्हिडिओमध्ये चहल अर्शदीप सिंग, दीपक हुड्डा आणि हर्षल पटेल यांची मस्करी करतोय. या व्हिडिओमध्ये चहलने तिन्ही खेळाडूंकडून T20 वर्ल्डकपची उत्सुकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 


तिन्ही खेळाडूंसाठी हा पहिलाच विश्वचषक आहे. चहल हर्षल पटेलला मुलाखतीत मजेदार प्रश्न विचारतो. अशा स्थितीत हर्षल पटेल मुलाखतीदरम्यान इंग्रजीत बोलताना दिसतोय. तेव्हाच चहलने त्याला गमतीने सांगितलं की, "आम्ही इथे हिंदीत बोलत आहोत आणि तू इंग्रजीत बोलतोस." दरम्यान यानंतर हर्षल हिंदीत बोलू लागला.



दुसरीकडे, अर्शदीप सिंग भारतीय कोट घात्यानंतर म्हणतो, “माझी छाती रूंद नाहीये पण भारतीय कोट घातल्याने अभिमानाने रुंद झाली आहे.”


हर्षलची खराब कामगिरी


दुखापतीनंतर हर्षल पटेल टीममध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण, तसं घडताना दिसलं नाही. गेल्या काही सामन्यांमधून हर्षल गोलंदाजीच्या बाबतीत चांगलाच महागात पडताना दिसतोय. दरम्यान त्याला वर्ल्डकपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास तो स्वत:ला सिद्ध करेल, अशी अपेक्षा आहे.