नॉटिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा २०३ रननी विजय झाला. या मॅचमध्ये विराट कोहलीनं पहिल्या इनिंगमध्ये ९७ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये १०३ रन केल्या. या कामगिरीमुळे विराटला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. या मॅचमधून ऋषभ पंतनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच टेस्ट मॅचमधली पंतची कामगिरी स्वप्नवत राहिली. पंतनं पहिल्या इनिंगमध्ये ५ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये २ कॅच असे एकूण ७ कॅच पकडले. पहिल्याच मॅचमध्ये ७ कॅच पकडण्याचं रेकॉर्डही ऋषभ पंतनं त्याच्या नावावर केलं. तसंच पंतनं बॅटिंग करताना टेस्ट क्रिकेटमधील पहिली रन सिक्स मारून केली. पंत टेस्ट इतिहासात सिक्स मारुन कारकिर्दीची सुरुवात करणारा १२ वा खेळाडू आणि पहिला भारतीय ठरला. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये पंतनं २४ रन केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच ऋषभ पंतसोबतचा एक फोटो भारतीय टीमचा गब्बर म्हणजेच शिखर धवननं शेअर केला आहे. या फोटोमध्ये शिखर धवन ऋषभ पंतबरोबर धावताना दिसत आहे. 'भाग धन्नो भाग' असं कॅप्शन शिखर धवननं या फोटोला दिलं आहे.



पहिल्या टेस्ट मॅचमधल्या खराब कामगिरीनंतर शिखर धवनला दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये डच्चू देण्यात आला होता. पण तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये धवनला पुन्हा संधी देण्यात आली. मिळालेल्या या संधीनंतर धवननं तिसऱ्या टेस्टमध्ये भारताला चांगली सुरुवात करून दिली. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये धवननं ३५ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ४४ रन केल्या. ओपनिंगला आलेल्या धवन आणि लोकेश राहुलनं भारताला पहिल्या इनिंगमध्ये ६० आणि दुसऱ्या इनिंगमध्येही ६० रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली.


३० सप्टेंबरपासून भारत आणि इंग्लंडमधल्या चौथ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजच्या पहिल्या दोन टेस्ट भारतानं गमावल्या होत्या. त्यामुळे इंग्लंड या सीरिजमध्ये २-१नं आघाडीवर आहे.