अभिनेत्री पायल घोषकडून मोहम्मद शमीला लग्नाची ऑफर! पत्नी हसीन जहाँ म्हणाली, `सेलिब्रिटींबरोबर अशा...`
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या लग्नाच्या प्रस्तावाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. शमीला बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषकडून हा प्रस्ताव आला होता. पायलने सोशल मीडियावर शमीला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यावर पत्नी हसीन जहाँने प्रतिक्रिया दिली आहे.
Hasin Jahan on Payal Ghosh Proposal : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (ind vs aus) असा वर्ल्डकपच्या अंतिम सामना होणार आहे. विजेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे या स्पर्धेत फॉर्मात असलेल्या वेगवाग गोलंदाज मोहम्मद शमीकडे (Mohammed Shami) सगळ्यांचे लक्ष आहे. शमीच्या गोलंदाजींचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दखल घेतली होती. मात्र शमीचे खासगी आयुष्य देखील वर्ल्डकप स्पर्धेमुळे पुन्हा चर्चेत आलं आहे. शमीच्या गोलंदाजीवर प्रभावीत होऊन अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) त्याला लग्नाची ऑफर दिली होती. त्यावर आता शमीची पत्नी हसीन जहाँने (Hasin Jahan) प्रतिक्रिया दिली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीत 7 विकेट घेत मोहम्मद शमीने इतिहास रचला होता. 50 षटकांच्या विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय गोलंदाजाकडून सर्वोत्तम विकेट घेण्याचा विक्रम शमीने केला होता. या यशानंतर मोहम्मद शमीला अभिनेत्री-राजकारणी पायल घोषकडून लग्नाचा प्रस्ताव आला होता. मोहम्मद शमीची दुसरी पत्नी बनण्यास तयार असल्याचे पायल घोषने म्हटलं होतं. पायल घोषने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर , "शमी, तुझे इंग्रजी सुधार, मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे," असे म्हटलं होतं.
पायल घोषने मोहम्मद शमीला दिलेल्या लग्नाच्या प्रस्तावावर हसीन जहाँने प्रतिक्रिया दिली आहे. 'प्रसिद्ध व्यक्तींसोबत या गोष्टी घडत असतात. ही खूप सामान्य गोष्ट आहे. मला यावर काहीच बोलायचं नाही,'' असे हसीन जहाँ म्हणाली. याआधी हसीन जहाँने मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले होते. त्याला आयुष्यात एक करोडपती अभिनेत्री हवी आहे. याच कारणामुळे तो मला त्रास देत असे आणि या काळात त्याने आपल्या मुलीचा विचारही केला नाही, असे हसीन जहाँ म्हणाली होती.
मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ एकमेकांपासून दूर गेले आहेत. त्यांनी 2014 मध्ये लग्न केले होते आणि 2015 मध्ये एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर, हसीन जहाँने 2018 मध्ये त्याच्यावर मॅच फिक्सिंग आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. दोघांविरुद्ध अटक वॉरंटही जारी केलं होतं. मात्र, कोलकाता न्यायालयाने या वॉरंटला स्थगिती दिली होती. त्याआधी, मोहम्मद शमीने हसीन जहाँला मासिक देखभाल भत्ता 1.30 लाख देण्याचे आदेश दिले होते.