Cricket : विकेट घेतल्यावर पठ्ठयाने केलं अजब सेलिब्रेशन, पहिलं केलं सेल्युट मग बूट खोलून.... Video
इंटरनॅशनल क्रिकेट पासून ते लोकल टूर्नामेंटपर्यंतच्या सामन्यात विकेट घेतल्यावर किंवा शतक तसेच अर्धशतक लगावल्यावर खेळाडू आपापल्या स्टाईलने सेलिब्रेशन करताना दिसतात.
Wicket Celebration Viral Video : क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंचे अजब सेलिब्रेशन पाहायला मिळते. इंटरनॅशनल क्रिकेट पासून ते लोकल टूर्नामेंटपर्यंतच्या सामन्यात विकेट घेतल्यावर किंवा शतक तसेच अर्धशतक लगावल्यावर खेळाडू आपापल्या स्टाईलने सेलिब्रेशन करताना दिसतात. एक असाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहीद भगतसिंह स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या एका सामन्यात गोलंदाजाने विकेट घेतल्यावर असेच हटके सेलिब्रेशन केले.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात एका सामन्यात गोलंदाजाने विकेट घेतल्यावर अजब प्रकारे सेलिब्रेशन केले. स्पिन गोलंदाजाने बॉल टाकला यावेळी बॉल फलंदाजाच्या पायावर जाऊन बसला. अंपायरकडे वळून गोलंदाजाने विकेटसाठी अपील केले. यावेळी अंपायरने सुद्धा फलंदाजाला आउट करार दिला. यावेळी गोलंदाज आनंदात जमिनीवर पायांची घडी मारून बसला. त्याने बसल्याबसल्या सेल्युट ठोकला. विकेट घेतल्याचा आनंद गोलंदाजाच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी त्याने पायातील बूट काढला आणि कानावर लावला.
हेही वाचा : विनेशचं स्वागत करताना बजरंग पुनियाकडून तिरंग्याचा अपमान? सोशल मीडियावर टीकेची झोड Video
अजब सेलिब्रेशन पाहून नेटकरी हैराण :
गोलंदाजाने विकेट घेतल्यावर त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. अंपायरने फलंदाजाला आउट करार दिल्यावर तो थेट मैदानात मांडी घालून बसला आणि कडक सेल्युट ठोकला. त्याच सेलिब्रेशन एवढ्यावरच थांबलं नाही, त्याने पायातील शूज काढून कानावर फोन पकडल्या सारखा लावला. त्यानंतर गोलंदाजाने तोच शूज हवेत उंच फेकला आणि मग जमिनीवर लोळून पुश अप मारू लागला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.