क्रिकेट नियमांमध्ये ऐतिहासिक बदल; कॉमेंट्रीत बॅट्समनऐवजी होणार `हा` उल्लेख
क्रिकेटच्या नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे.
दिल्ली : क्रिकेटच्या नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. आता या गेममध्ये फलंदाजाला 'बॅट्समन' नाही तर 'बॅटर' म्हटलं जाणार. मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) बुधवारी हे स्पष्ट केलंय की, क्रिकेटच्या खेळात आता महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंसाठी एकच शब्द असेल आणि तो म्हणजे 'बॅटर'.
बॅटर शब्द आणण्यामागे कारण
क्रिकेटच्या नियमांमध्ये अचानक झालेल्या या बदलाचा उद्देश महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान दर्जा देणं हा आहे. यामुळे क्रिकेटचा दर्जा आणखी सुधारण्यास मदत होईल. आता तात्काळ प्रभावाने पुरुष आणि महिला दोघांसाठी 'फलंदाज' ऐवजी 'जेंडर न्यूट्रल' 'बॅटर' हा शब्द वापरला जाईल. एमसीसीचा असा विश्वास आहे की 'जेंडर न्यूट्रल' क्रिकेटचा दर्जा सर्वांसाठी समान बनवण्यास मदत करेल.
का करावा लागला हा बदल?
महिला आणि मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अधिकाधिक 'जेंडर न्यूट्रल' शब्द वापरण्याबाबत चर्चा झाली. अनेक प्रशासकीय संस्था आणि माध्यम संस्था आधीच 'बॅटर' हा शब्द वापरत आहेत.
एमसीसीच्या म्हणण्याप्रमाणे, "2017मधील 'रिड्राफ्ट’ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि महिला क्रिकेटच्या काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यानंतर सहमती झाली की खेळाच्या नियमांनुसार, 'बॅट्समन' हाच शब्द राहील."
'बॅट्समन' हा शब्द कायमचा काढून टाकण्यात आला
'बॅटर' या शब्दाचा वापर ही नैसर्गिक प्रगती आहे, जी नियमांमध्ये 'बॉलर' आणि 'फिल्डर' या शब्दांशी सुसंगत आहे.