Team India win the 3rd ODI By 317 Runs beat Sri Lanka : भारत आणि श्रीलंकेमधील तिसरा एकदिवसीय सामन्यात भारताने वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 391 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 73 धावांवर आटोपला. भारताने  317 धावांनी विजय मिळवला आहे. याआधी 2008 साली न्यूझीलंडने 290 धावांनी आर्यलँडवर सर्वात मोठा विजय मिळवला होता. भारतीय संघाने या विजयासह श्रीलंकेला 3-0 ने व्हाईटवॉश दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाने संक्रांत गोड केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विराट कोहलीची आक्रमक 166 धावांची नाबाद खेळी आणि युवा शुभमन गिलचं 116 शतक याच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर 391 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. कोहलीनेही त्याच्या कारकिर्दीतील 46 वं शतक ठोकत सचिन तेंडुलकरचा देशातील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला आहे. 


भारताच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या बॅटींग ऑर्डरला खिंडार पाडलं. सिराजने कुसल मेंडिस 4, अविष्का फर्नांडो 1, नुवानिदू फर्नांडो 19, आणि वानिंदू हसरंगा 1 यांना बाद केलं. नुवानिदू फर्नांडो वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. फर्नांडो, शनाका 11, कसून राजिथा नाबाद 13 हे खेळाडू दुसऱ्या एकाही फलंदाजाने दुहेरी धावसंख्या केली नाही. 


मोहम्मद सिराजने 5 विकेट पूर्ण करण्यासाठी 1 विकेट घ्यायला आपली पूर्ण ताकद पणाला लावली. मात्र त्याला यश आलं नाही. सिराजसह कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. श्रीलंकेला विराटला दिलेलं जीवदान महागात पडलं. विराट कोहलीने शतक केल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला, सिक्स आणि चौकार मारत संघाला 400 च्या जवळपास आणून ठेवलं. 


दरम्यान, भारतीय संघाने टी-20 मालिका जिंकत वनडे मालिकेमध्ये 3-0 ने व्हाईटवॉश दिला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने इतिहासातील मोठा विजय साकारला आहे.