Rishabh Pant : कौतूकास्पद! ऋषभ पंतचे प्राण वाचवणाऱ्या बस ड्रायव्हरचा सन्मान
Rishabh Pant : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला शुक्रवारी 30 डिसेंबरच्या पहाटे भीषण अपघात झाला होता. रुरकीजवळील मोहम्मदपूर जाट भागात पंतच्या गाडीला अपघात झाला. या अपघातातून त्याला हरयाणा परिवहन मंडळाचा ड्रायव्हर सुशील मान आणि वाहक परमजीत सिंगने वाचवले होते.
Rishabh Pant Car Accident : टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर आणि फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) सुदैवाने मोठ्या अपघातातून बचावला आहे. या अपघातूत त्याला सुखरूप वाचवण्यात एका ड्रायव्हर आणि कंडक्टरने मोलाची भूमिका बजावली होती. याच ड्रायव्हर आणि कंडक्टरचा आता पानीपत डेपोकडून सत्कार करण्यात आला आहे. तसेच आता हरीयाणा सरकार (Hariyana Government) देखील या दोघांचा सन्मान करणार असल्याची माहिती आहे.
ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला शुक्रवारी 30 डिसेंबरच्या पहाटे भीषण अपघात झाला होता. रुरकीजवळील मोहम्मदपूर जाट भागात पंतच्या गाडीला अपघात झाला. या अपघातातून त्याला हरयाणा परिवहन मंडळाचा ड्रायव्हर सुशील मान आणि वाहक परमजीत सिंगने वाचवले होते. मात्र तरीही या अपघातात पंतच्या डोक्याला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. याशिवाय पाठीच्या आणि पायाच्या काही भागात जखमा देखील झाल्या होत्या.
असे वाचवले प्राण
हरयाणा परिवहन मंडळाचा ड्रायव्हर सुशील कुमार हरिद्वारहून येत होता.नारसनजवळ येताच दिल्लीवरून येणारी एक कार डिव्हायडरला आदळल्याचे त्याने पाहिले. त्यानंतर ही कार त्याच्याच बसच्या अगदी समोर आली होती आणि धडकण्याची शक्यता होती. तितक्यात मी सर्विस लाईनवरून बस पहिल्या लेनमध्ये नेली अन् कार दुसऱ्या लेनमधून मागे गेली. ड्रायव्हर सुशीलने अर्जंट ब्रेक मारला आणि बस मधून उडी टाकून कारकडे धाव घेतली. त्यानंतर बसचा चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी ऋषभला जळत्या मर्सिडीज बेंझमधून बाहेर पडण्यास मदत केली.
ऋषभ पंतला (Rishabh Pant) वाचवल्यानंतर पाणीपत डेपोने सुशील मान आणि परमजीत सिंग यांचा सत्कार केल्याची माहिती डेपोचे व्यवस्थापक कुलदीप झांगरा यांनी दिली. तसेच हरियाणा परिवहन विभागाचे मुख्य सचिव नवदीप सिंग यांनीही दोघांचे कौतुक केलं. या दोघांच्या माणूसकीचे आता संपुर्ण देशभर चर्चा आहे.