World Cup 2023 : येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपला ( ICC world cup ) सुरुवात होणार आहे. यासाठी मंगळवारी टीमची घोषणा करण्यात आली. या 15 खेळाडूंच्या स्क्वॉडमध्ये चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे, युझवेंद्र चहलला ( Kuldeep yadav ) डावलून कुलदीप यादवला टीममध्ये कशी संधी मिळाली. दरम्यान याचा खुलासा अखेर झाला आहे. 


कुलदीप यादवला कसं मिळालं वर्ल्डकपचं तिकीट?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलदीप यादवचा ( Kuldeep yadav ) रेकॉर्ड पाहिला तर 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये 23 विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीपचे ( Kuldeep yadav ) बालपणीचे प्रशिक्षक कपिल पांडे याबाबत म्हणाले, 'त्याचं मन दुखावलं होतं. भारताकडून खेळणं सोडा, त्याला आयपीएलच्या केकेआरमध्ये संधी मिळत नव्हती. गोलंदाजाने आपल्या कौशल्यावर सतत काम करत राहणं आवश्यक असते. असं असूनही कुलदीपने हार मानली नाही. नेटमध्ये बराच वेळ माझ्यासोबत सराव केला. आम्ही अनेक गोष्टींवर काम केलं.


कुलदीपच्या सिलेक्शन मागे काय आहे इनसाईड स्टोरी


कोणत्याही क्रिकेटपटूला अनुभव असलेल्या मार्गदर्शकाची गरज असते. कुलदीपसाठीही ( Kuldeep yadav ) अशी एक व्यक्ती होती. ही व्यक्ती म्हणजे सुनील जोशी. 


यासंदर्भात जोशी म्हणाले, 'कुलदीप वाईट टप्प्यातून जात होता त्यावेळी मी निवड समितीमध्ये होतो. इतका प्रतिभावान गोलंदाजाला अशाप्रकारे पाहून वाईट वाटलं. आम्ही NCA मध्ये भेटलो आणि पुढील रणनीती बनवली. आम्ही त्यावेळी तांत्रिक बाबींवर काम करत होतो. यावेळी त्याच्या कृतीत सुधारणा आवश्यक होती. आता त्याच्यात बदल झालेला दिसतोय.


आयपीएलमध्येही केकेआरमधून दिल्ली कॅपिटल्समध्ये येण्याचा फायदा कुलदीपला ( Kuldeep yadav ) झाला. कपिल पांडे म्हणाला, 'कुलदीपने ( Kuldeep yadav ) मला सांगितलं की, दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने त्याला खूप प्रोत्साहन दिलं. गोलंदाजासाठी कर्णधार आणि प्रशिक्षक यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो. 


वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.