मुंबई: टोकियो ऑलिम्पिकमध्य़े भारताचा आजचा शेवटचा दिवस खऱ्या अर्थानं सुवर्णदिवस ठरला आहे. भारताला 7 पदकं टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळाली आहेत. ही पदकं मिळवून सात हिऱ्यांनी भारताच्या शिरपेचात खऱ्या अर्थानं मानाचा तुरा रोवला आहे. हे सात हिरे कोण आहे आणि कोणत्या खेळात त्यांना मेडल्स मिळाली आहेत जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भालाफेक फायनलमध्ये नीरज चोप्राने मोठं यश मिळविले आहे. गोल्ड मेडल मिळविलं आहे. ऍथलिटिक्समध्ये नीरजने सोनेरी यश मिळविले पहिल्या फेरीपासून निरजने आघाडी घेतली होती. ८७. ५८ मीटरपर्यंत भाला फेकून निरजने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 



मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवलं आहे. तिच्या कामगिरीचं संपूर्ण भारतात कौतुक होत आहे.



कुस्तीपटू रवीकुमार दहीया याच्यावर प्रतिस्पर्ध्यानं दाताने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही हार न मानता त्याला चितपट करत भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे. त्याच्या या कामगिरीचंही खूप कौतुक होत आहे. 



 भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने (Wrestler Bajrang Punia) ब्रॉन्झ मेडल पटकावलं आहे. बजरंगने कझाकस्तानचा कुस्तीपटू  याचा 8-0 अशा एकतर्फी अंतराने पराभव केला 



पी व्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. त्याने कांस्यपदक पटकावले आहे. सिंधूने चीनच्या बिंगजियाओचा 21-13, 21-15 असा पराभव करत कांस्यपदकावर नाव कोरले. 


 



लव्हलिना बोरगोईने बॉक्सिंगमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिलं आहे.23 वर्षांची बॉक्सर लव्हलिना मेडल जिंकणारी दुसरी महिला ठरली आहे. यापूर्वी 2012 मध्ये मेरिकोमने बॉन्झ मेडल जिंकलं होतं. तिच्या कामगिरीचं भारतातच नाही तर जगभरात कौतुक होतं आहे.


 



ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्यपदकाची कमाई केली आहे. भारतीय हॉकी संघाने जर्मनीचा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला. भारतीय हॉकी संघाला 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची संधी मिळाली