IND vs SL Final: पाऊस पडल्यास Reserve Day ला किती ओव्हर्सचा होणार सामना? पाहा नियम काय सांगतो?
IND vs SL Final : फायनल सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आलीये. रविवारी कोलंबोमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. मात्र जर पाऊस पडला तर Reserve Day चे नियम काय आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.
IND vs SL Final : 17 सप्टेंबर रोजी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये एशिया कपचा फायनल महामुकाबला रंगणार आहे. आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये या दोन्ही टीम आमने-सामने येणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यापैकी कोण बाजी मारणार हे पाहवं लागणार आहे. यापूर्वी टीम इंडियने 7 वेळा तर श्रीलंकेने 6 वेळा एशिया कपच्या टायटलवर आपलं नाव कोरलंय. मात्र आजच्या दिवशी देखील पावसामुळे चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार, आज कोलंबोमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे फायनलच्या सामन्यात पावसाचा खेळ होण्याची शक्यता आहे.
फायनल सामन्यात पावसाचा व्यत्यय?
भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील अंतिम सामना आर प्रेमदासा स्टेडियममध्ये रंगणार आहे. पण या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आलीये. रविवारी कोलंबोमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. मात्र जर पाऊस पडला तर Reserve Day चे नियम काय आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 17 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये 90 टक्के पावसाचा अंदाज आहे. यावेळी काळे ढग असू शकतात. तर तापमान 29 अंश सेल्सिअस ते 24 अंशांपर्यंत राहील. तसंच ताशी 18 किलोमीटर वेगाने वारे वाहतील.
रिझर्व्ह डेला कधी खेळवला जाणार सामना?
फायनल सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. त्यानुसार जर पाऊस पडला तर उर्वरित सामना 18 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. मात्र आजच्या दिवशी म्हणजेच रविवारी दोन्ही टीम्सची 20 ओव्हर्स खेळवले गेले तर हा सामना रिझर्व्ह डे ला खेळवला जाणार नाही. यावेळी आजच्यात दिवशी या सामन्याचा निकाल लावण्यात येणार आहे.
रिझर्व्ह डेचे नियम काय आहेत?
जर हा सामना रिझर्व्ह डे ला खेळवला गेला तर जिथे 17 तारखेला सामना थांबवण्यात आलाय तिथूनच सामन्याला सुरुवात केली जाणार आहे. यावेळी पुन्हा नव्याने टॉस होणार नाही. दरम्यान हा सामना किती ओव्हर्सचा होणार हे अंपायर ठरवणार आहेत. त्यामुळे अंपायर्स जेवढ्या ओव्हर्सचा खेळ ठरवतील तितक्यांचा सामना खेळवण्यात येणार आहे.