`वर्ल्ड कप जिंकणार तरी कसा?`, युवराजच्या लॉजिकल प्रश्नावर सेहवागने काढला आकड्यांचा पाणउतारा, म्हणतो...
ICC ODI World Cup 2023 : टीम यंदा वर्ल्ड कप जिंकून आणेल, यात काही शंका नाही. मात्र, आता टीम इंडियाला दोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या युवराज सिंग (Yuvraj Singh) सध्या टेन्शनमध्ये आहे. युवराजने टीम इंडियाला लॉजिकल प्रश्न विचारले आहेत. त्यावर सेहवागने (Virender Sehwag ) उत्तर दिलंय.
Virender Sehwag On Yuvraj Singh : क्रिकेटचा महाकुंभ अशा आयसीसी एकदिवसीय विश्वचषकची (ICC ODI World Cup 2023) सुरूवात येत्या 5 ऑक्टोबरपासून होत आहे. यंदाचा वर्ल्ड कप भारतात खेळवला जाणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वर्ल्ड कपचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला खेळवला जाईल. या दीड महिन्याच्या कालावधीत धमाकेदार सामने पहायला मिळणार आहेत. अशातच आता वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया (Indian Cricket Team) जाहीर करण्यात आली आहे. कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 जणांची टीम यंदा वर्ल्ड कप जिंकून आणेल, यात काही शंका नाही. मात्र, आता टीम इंडियाला दोन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या युवराज सिंग (Yuvraj Singh) सध्या टेन्शनमध्ये आहे. युवराजने टीम इंडियाला लॉजिकल प्रश्न विचारले आहेत. त्यावर सेहवागने (Virender Sehwag ) उत्तर दिलंय.
युवराजचा वर्ल्ड कपचं टेन्शन...
आम्हा सर्वांना आगामी वर्ल्ड कपमध्ये 2011 ची पुनरावृत्ती हवी आहे. 2011 मध्ये टीम इंडिय़ा दबावाखाली खेळली आणि चमकली सुद्धा. 2023 मध्ये पुन्हा संघावर कामगिरीचे दडपण आहे. याकडे वळण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे का? हा दबाव आपण ‘गेम चेंजर’ बनण्यासाठी वापरू शकतो का? असा सवाल युवीने विचारला आहे. तसेच टीम इंडिया वर्ल्ड कप (CWC 2023) जिंकणार तरी कसा? असा लाख मोलाचा सवाल युवराज सिंहने विचारला आहे. युवराजच्या या टेन्शनवर सेहवागने मात्रा शोधून काढलीये.
सेहवाग काय म्हणतो...
युवी पाजी, जर गोष्ट प्रेशरवरची आहे, तर यावेळी प्रेशर आपल्या संघावर नसेल, आपण दुसऱ्यांना प्रेशर देऊ. जसं चॅम्पियन प्रेशन घेत नाहीत. तसं आपण न घेता दुसऱ्यांना देऊ. गेल्या 12 वर्षात ज्या संघाने होस्ट केलंय, तोच संघ जिंकलाय, असं वीरेंद्र सेहवाग म्हणतो. त्यावेळी त्याने आकड्यांचा पाणउतारा काढला. 2011 साली आपण वर्ल्ड कप जिंकला होता. 2015 साली होस्टिंग करणारा ऑस्ट्रेलिया जिंकला होता. त्यानंतर इंग्लंडने देखील 2019 साली वर्ल्ड कप जिंकला आता 2023 मध्ये आपल्याला संधी आहे, असं सेहवाग (Virender Sehwag On Yuvraj Singh) म्हणतो.
पाहा ट्विट -
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर.
भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक:
8 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
14 ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनौ
2 नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
५ नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरू.