Babar Azam: सेमीफायनल गाठण्यासाठी 100%...; बांगलादेशाला नमवून बाबर आझमचं मोठं वक्तव्य
Babar Azam: सलग 4 सामने गमावल्यानंतर पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून वर्ल्डकपमध्ये तिसरा विजय नोंदवला. विजयानंतर कर्णधार बाबर आझम खूप आनंदी दिसला आणि त्याने आपल्या खेळाडूंबद्दल मोठं वक्तव्य केलंय.
Babar Azam: 31 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरूद्ध बांगलादेश यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात पाकिस्तानच्या टीमने बांगलादेशाचा पराभव केला. पाकिस्तानच्या टीमने 7 विकेट्ने बांगलादेशावर मात केली. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत 204 रन्स करत प्रत्युत्तरात पाकिस्तानने सहज विजय मिळवला. सलग 4 सामने गमावल्यानंतर पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून वर्ल्डकपमध्ये तिसरा विजय नोंदवला. विजयानंतर कर्णधार बाबर आझम खूप आनंदी दिसला आणि त्याने आपल्या खेळाडूंबद्दल मोठं वक्तव्य केलंय.
विजयानंतर काय म्हणाला बाबर आझम
बांगलादेशाला 7 विकेट्स राखून पराभूत केल्यानंतर कर्णधार बाबर आझमने खेळाडूंचं कौतुक केलंय. बाबर म्हणाला की, तिन्ही विभागात ज्या पद्धतीने खेळलो त्याचं संपूर्ण श्रेय खेळाडूंना जातं. फखर जेव्हा खेळतो तेव्हा तो किती चांगला खेळतो हे आम्हाला माहीत आहे. त्याला असं करताना पाहून आनंद झाला. आम्ही आमचे उर्वरित सामने जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत.
या विजयामुळे आगामी सामन्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, अशी आशा आहे. आमच्या मुख्य गोलंदाजांनी आक्रमण केलं. आमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि विकेट्स घेतल्या. सेमीफायनल गाठण्यासाठी 100 टक्के देण्याचा प्रयत्न करू. मला आणि माझ्या टीमला पाठिंबा दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार, असंही बाबरने म्हटलंय.
पाकिस्तानच्या फलंदाजांचा चांगला खेळ
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची टीम 204 रन्सचं करू शकली. बांगलादेशकडून महमुदुल्लाहने सर्वाधिक 56 रन्सची खेळी केली. याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलं नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने हा सामना सहज जिंकला. पाकिस्तानच्या वतीने सलामीवीर फखर जमान आणि अब्दुल्ला शफीक यांनी पहिल्या विकेटसाठी 128 रन्सची पार्टनरशिप केली, ज्यामुळे पाकिस्तानने सामना जिंकला.
मोठी खेळी करण्यात बाबर पुन्हा अपयशी
या सामन्यात कर्णधार बाबर आझमने 16 बॉल्समध्ये 9 रन्सची खेळी केली. बाबर मेहदी हसन मिराझचा बळी ठरला. याआधी बाबरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५० रन्स केले होते, तर अफगाणिस्तानविरुद्ध 74 रन्सची खेळी केली होती. भारताविरुद्धही त्याने 50 रन्स केलेले.