मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नई आणि मुंबई टीमने अत्यंत वाईट कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये 5 ट्रॉफी जिंकलेली टीम 15 व्या हंगामात चांगली कामगिरी करू शकली नाही. मुंबई टीमने 13 पैकी 10 सामने जिंकले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई टीमने 13 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर 9 सामने पराभूत झाले आहेत. हैदराबादने 13 पैकी 6 सामने जिंकले आहेत. हैदराबाद आठव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्स सातव्या स्थानावर आहे.


गुजरात टीमने प्लेऑफचं तिकीट काढलं आहे. 13 पैकी 10 सामने जिंकून 20 पॉईंटसह पहिल्या स्थानावर आहे. राजस्थान टीम दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान आणि लखनऊ टीमकडे 16 पॉईंट्स आहेत. 


दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू या दोन्ही टीमचे 14 पॉईंट्स आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोण प्लेऑफपर्यंत पोहोचणार हे पाहावं लागणार आहे. तर पंजाब आणि कोलकाताकडे 12 पॉईंट्स आहेत. त्यांना अजून दोन सामने जिंकावे लागणार आहेत. 


हैदराबाद जवळपास प्लेऑफमधून बाहेर गेल्यात जमा आहे. याचं कारण म्हणजे नेट रनरेटही खूप कमी आहे. त्यामुळे एवढं कव्हर करणं हैदराबादला कठीण आहे. मात्र दिल्ली आणि बंगळुरू प्लेऑफला कसे पोहोचणार हे पाहाणं अधिक रंजक असणार आहे.