Hardik Pandya: आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची ( Team India ) सध्या चांगली कामगिरी सुरु आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) पाकिस्तानच्या टीमचा 7 विकेट्सने पराभव केला. वनडे वर्ल्डकप 2023 ( World cup ) मध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव करत सलग तिसरा सामना जिंकला. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात सर्व चाहत्यांचं लक्ष वेधलं ते हार्दिक पंड्याच्या ( Hardik Pandya ) एका कृत्याने. पाकिस्तानच्या 13 व्या ओव्हरमधील हार्दिक पांड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दरम्यान सामन्यानंतर हार्दिक पंड्याने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने ( Hardik Pandya ) 34 रन्स देत 2 विकेट्स काढले. गोलंदाजी करत असताना 13 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर हार्दिक ( Hardik Pandya ) बॉल तोंडासमोर घेऊन काहीतरी पुटपुटताना दिसला. यानंतर हा बॉल टाकला आणि त्याला विकेट मिळाली. विकेट मिळताच सर्वांनी 'आ' वासला. कोणालाच कळेना की नेमकं कसं घडलं. मात्र सामन्यानंतर यामागील खरी गोष्ट हार्दिक पंड्याने सर्वांसमोर आणली.


हार्दिक पंड्याने स्वतःलाच दिली शिवी


पांड्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती की, पांड्याने काय केलं? सामन्यानंतर माजी खेळाडू गौतम गंभीर आणि इरफान पठाण यांच्याशी बोलत असताना पांड्या गंमतीने सांगितलं की, मी स्वत:लाच शिव्या दिल्या. मी बॉलला नाही, स्वत:लाच सांगत होतो.. मी स्वत:लाच समजावत होतो की अचूक टप्प्यावर बॉल टाक.


बाबर आणि रिझवान हे मर्यादितच शॉट्स खेळत होते. त्यांनी कोणतीही चूक करण्याची संधी घेतली नाही. दोन्ही फलंदाज आक्रमक झाले नाहीत म्हणूनच आम्ही डॉट बॉल टाकू शकलो. मी पाहिलंय की, जर दोन खेळाडू एकाच पद्धतीने फलंदाजी करत असतील तर तेव्हा एक बाद झाल्यावर लगेचच दुसऱ्याला बाद करण्यासाठी खूप चांगली संधी असते, असंही हार्दिकने ( Hardik Pandya ) सांगितलं.


टीम इंडियाचा पाकिस्तानवर विजय


रविवारी झालेल्या सामन्यात टॉस जिंकून टीम इंडियाने ( Team India ) पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय टीम इंडियासाठी खूपच फायदेशीर ठरलेला दिसला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानची टीम अवघ्या 191 रन्सवर आटोपली. टीम इंडियाच्या ( Team India ) घातक गोलंदाजीपुढे पाकिस्तानी फलंदाजांनी शरणागती पत्करली. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 7 विकेट्स राखून सामना जिंकला. या सामन्यात देखील रोहित शर्माने तुफान खेळी केली.