मुंबई : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने इतिहास रचला. 26 वर्षांच्या चानूने वेटलिफ्टिंगच्या 49 किलोग्रॅम कॅटेगिरीमध्ये सिल्वर मेडल पटकावलं. मीराबाईने भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधलं पहिलं पदकं पटकावलंय. सर्व भारतीय मीराबाईच्या कामगिरीवर खूश असून तिला शुभेच्छा देत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान मीराबाई देखील देशासाठी पहिलं पदक पटकावल्याने फार खूश आहे. WIONचे स्पोर्ट एडिटर दिग्विजय सिंह यांनी घेतलेल्या इंटरव्यूमध्ये मीराबाई म्हणाली, देशासाठी पहिलं पदकं पटकावून मी फार खूश आहे. 


मीराबाई पुढे म्हणाली, मी माझा बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी तयार होती. 2016च्या ऑलिम्पिकने मला खूप काही शिकवलं. मी गोल्ड मेडल जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले होते मात्र मी गोल्ड मेडल जिंकू शकली नाही. जेव्हा मी दुसऱं लिफ्ट केलं त्यावेळी मला समजलं हो की देशासाठी मेडल जिंकणार आहे. मेडल जिंकण्याचा मला फार आनंद आहे. 


"संपूर्ण देश त्यावेळी मला पाहत होता. सर्व देशवासियांनी माझ्याकडून आशा ठेवली होती. मी थोडीशी बैचेन होते मात्र सर्वश्रेष्ठ देण्याचं मनाशी पक्क केलं होतं. मी त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती," असंही मीराबाईने सांगितलं आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिल्वर मेडल जिंकल्यानंतर मीराबाई चानूला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं आहे. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, "यापेक्षा जास्त चांगल्या सुरुवातीची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. मी तिला वेटलिफ्टिंगमध्ये सिल्वर मेडल जिंकण्याबद्दल शुभेच्छा देतो. हिचं यश प्रत्येकाला प्रोत्साहित करेल."