Rohit Sharma: या विजयानंतर मी उत्साही नाही...; पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?
Captain Statement : विजयासह टीम इंडियाने वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. टीम इंडियाचा ( Team India ) हा वर्ल्डकपमधील सलग तिसरा विजय असून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) देखील यावेळी खुश दिसून आला.
Captain Statement :अखेर 14 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यात महामुकाबला झाला आणि भारतीय चाहत्यांना अपेक्षित होता असा निकाल देखील मिळाला. वर्ल्डकपच्या या हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. टीम इंडियाचा ( Team India ) हा वर्ल्डकपमधील सलग तिसरा विजय असून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) देखील यावेळी खुश दिसून आला.
या सामन्यात रोहित शर्माने ( Rohit Sharma ) टीमसाठी उत्तम खेळी करत अनेक भारतीय चाहत्यांचं मन जिंकलंय. अहमदाबादच्या पीचवर पाकिस्तानची टीम अवघ्या 191 रन्सवर ऑलआऊट झाली. यानंतर रोहित शर्माने पाकिस्तानच्या स्कोर संदर्भात मोठं विधान केलं आहे.
पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये बोलताना रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला की, आज गोलंदाजांनीच आमच्यासाठी चांगला खेळ तयार केला. मुळात मला वाटत नाही की, ती 190 रन्सची खेळपट्टी होती. आम्ही 280 चा स्कोर बघत होतो. ज्या पद्धतीने गोलंदांजांनी धैर्य दाखवलं, ते आम्हाला खूप काही सांगून जातं.
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पुढे म्हणाला की, या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. या विजयानंतर मला उत्साही नाही व्हायचंय किंवा नाराजंही होऊ इच्छित नाही. मला संतुलित राहायचं असून शांतपणे पुढे जायचंय. आपल्या समोर येणारा प्रत्येक विरोध गुणवत्तेचा असतो. त्या दिवशी तुम्हाला चांगलं खेळायचं आहे आणि त्यावरच आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत
टीम इंडियाकडून पाकिस्तानचा धुव्वा
या सामन्यात टॉस जिंकून टीम इंडियाने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय टीम इंडियासाठी खूपच फायदेशीर ठरलेला दिसला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानची टीम अवघ्या 191 रन्सवर आटोपली. टीम इंडियाच्या घातक गोलंदाजीपुढे पाकिस्तानी फलंदाजांनी शरणागती पत्करली. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 7 विकेट्स राखून सामना जिंकला.
Rohit Sharma कडून पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई
या सामन्यात रोहित शर्माने ( Rohit Sharma ) पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलंच झोडपून काढलं. रोहित शर्माने ( Rohit Sharma ) पाकिस्तानविरूद्ध तुफान खेळी करत 63 बॉल्समध्ये 86 रन्सची खेळी केली. या खेळीत 6 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता. सध्या रोहित शर्मा ( Rohit Sharma ) चांगल्या फॉर्ममध्ये दिसून येत असून त्याने गेल्या सामन्यात देखील शतक झळकावलं होतं.