PBKS vs RCB IPL 2024: आयपीएलमध्ये गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात आरसीबीने पंजाबचा 60 रन्सने पराभव केला. आरसीबीच्या टीमने या विजयासह प्लेऑफच्या आशा अजून पल्लवीत ठेवल्या आहेत. तर दुसरीकडे या पराभवामुळे पंजाबच्या टीमचा प्लेऑफ गाठण्याचा मार्ग कठीण झाला आहे. या पराभवानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करण काय म्हणाला ते पाहूयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅम करनच्या नेतृत्वाखालील टीम पंजाबला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय. पराभवानंतर सॅम कुरनने चाहत्यांची माफी मागितली. तो म्हणाले की, आम्ही सतत शिकत आहोत आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतोय. या सामन्यात 22 रन्स करून तो बाद झाला. याशिवाय त्याला गोलंदाजीमध्येही काही फार चांगली कामगिरी करता आला नाही. 


पराभवानंतर काय म्हणाला सॅम करन


सामन्यानंतर पंजाब किंग्जच्या कामगिरीवर सॅम करनने प्रतिक्रिया दिलीये. तो म्हणाला, "स्पर्धेदरम्यान अनेक सकारात्मक संकेत मिळाले होते, मात्र महत्त्वाच्या सामन्यांमध्ये आम्हाला चांगली कामगिरी करता आली नाही. या गोष्टीचं मला प्रचंड वाईट वाटतंय. आम्हाला विराटची विकेट लवकर काढायची होती. आम्ही योग्य संयोजन वापरण्याचा प्रयत्न केला. पण तसं होऊ शकलं नाही. आम्ही चाहत्यांना हवा तसा आनंद देऊ शकलो नाही याबद्दल मी त्यांची माफी मागतो."


करनची खराब कामगिरी


सॅम करनला आरसीबीविरुद्ध काही विशेष कामगिरी करता आली नाही. त्याला 3 ओव्हरममध्ये 50 रन्स देऊन केवळ 1 बळी घेता आला. गोलंदाजीत तो टीमसाठी सर्वात महागडा ठरला. यासोबतच फलंदाजीतही विशेष कामगिरी झाली नाही. सॅम करनने 16 बॉल्समध्ये केवळ 22 रन्स केले. त्यामुळे कर्णधार म्हणून सॅम यंदाच्या सिझनमध्ये काही फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. 


पंजाबविरुद्ध नॉक आऊट सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळूच्या टीमने दमदार विजय मिळवला. पंजाबचा पराभव करत आयपीएल सिझनमधील 5 वा विजय मिळवला आहे. बंगळुरूने पंजाब किंग्जचा 60 धावांनी विजय मिळवला. तर दुसरीकडे पंजाब किंग्ज प्लेऑफमधून बाहेर पडलीये. पाईंट्स टेबलमध्ये आरसीबीची टीम सातव्या स्थानी पोहोचलीये आहे. आरसीबीने आत्तापर्यंत 12 सामने खेळले असून त्यामध्ये 5 विजय मिळवले आहेत. तर 7 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबीला आता प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावाच लागेल.