South african Captain Temba Bavuma : क्रिकेटचं महाकुंभ असलेल्या वर्ल्ड कपचं (World Cup 2023) बिगुल वाजलं आहे. उद्यापासून वर्ल्ड कपच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. न्यूझीलंडविरुद्घ इंग्लंड (Eng vs Nz) अशी पहिली भिडत होणार आहे. त्याआधी सर्व 10 संघाच्या कर्णधारांनी फोटोशूट (Captain meets) केलं. त्यावेळचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. साऊथ अफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बावुमा (Temba Bavuma) लाईव्ह कार्यक्रमात डुलक्या घेत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. त्यावर आता टेम्बा बावुमाने उत्तर दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कपपूर्वी रोहित शर्मा, बाबर आझम, केन विलयम्सन, जॉस बटलर, पॅट कमिन्स, शाकिब अल हसन, तेम्बा बावुमा, दासुन शनाका, हशमतुल्लाह शाहिदी आणि स्कॉट एडवर्ड्स यांनी कॅप्टन्स मीटला उपस्थिती लावली होती. त्यावेळी सर्व संघाच्या कॅप्टन्सला प्रश्न विचाण्यात आले होते. त्यावेळी टेम्बा बावुमा खाली मान घालून झोपल्यासारखं दिसतंय. तो फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर टेम्बा बावुमा याने ट्विटवर याचं उत्तर दिलंय.



मी कॅमेरा अँगलला दोष देतो, मला झोप येत नव्हती, असं टेम्बा बावुमा याने म्हटलं आहे. त्यावेळी त्याने नाराजी देखील बोलून दाखवली. अनेकदा कॅमेऱ्याच्या अँगलमुळे अनेक अविश्वसनिय फोटो पहायला मिळतात. अशातच एका फोटोचा टेम्बा बावुमा शिकार झालाय. टेम्बा बावुमाच्या उत्तराआधी सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल झालेत.




वर्ल्ड कपसाठी साऊथ अफ्रीकाचा संघ : 


तेम्बा बावुमा (कॅप्टन), गेराल्ड कोएत्ज़ी, क्विंटन डी कॉक, रीज़ा हेंड्रिक्स, मार्को जानसन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एंडिले फेहलुकवायो, कगिसो रबाडा, तबरेज़ शम्सी, रासी वैन डेर डुसेन, लिजाड विलियम्स.