Suryakumar Yadav: भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये मंगळवारी तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना खेळवण्यात आला. श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात सुपर ओव्हर झाली आणि भारताचा विजय झाला. या विजयासह टीम इंडियाने श्रीलंकेला टी-20 सिरीजमध्ये क्लिन स्विप दिला. दरम्यान या टी-20 सिरीजनंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने दिलेल्या वक्तव्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. पोस्ट प्रेझेंटेशनवेळी बोलताना सूर्या म्हणाला की, त्याला कर्णधार बनायचं नाही. दरम्यान सूर्याने असं विधान का केलंय हा प्रश्न आता चाहत्यांसमोर आहे. 


काय म्हणाला सूर्यकुमार यादव?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संपूर्ण सिरीजमध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. परंतु संपूर्ण सिरीजनंतर टीमच्या अतुलनीय कामगिरीनंतर सूर्यकुमारचं असं विधान आश्चर्यकारक होतं. सूर्यकुमार यादवच्या बाबतीत आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. कारण, त्याने असं म्हणण्याची ही पहिली वेळ नव्हती. त्याला कर्णधार व्हायचं नव्हतं, श्रीलंकेसोबत टी-20 सिरीज सुरू होण्यापूर्वीच त्याने ही गोष्ट बोलून दाखवली होती. श्रीलंकेविरुद्धची सिरीज जिंकल्यानंतर त्याने पुन्हा जुनं विधान केलं आहे. 


सूर्या का व्हायचं नाही कर्णधार?


दरम्यान सूर्यकुमार यादव जे म्हणाला त्यामागे त्याच्या भावना चांगल्या होत्या. सूर्याच्या बोलण्याचा अर्थ टीम इंडियाला धक्का बसेल किंवा टीमला नुकसान होईल असा नव्हता.  सूर्या म्हणाला की, कर्णधार बनण्याची माझी इच्छा नाही, मला लीडर बनायचं आहे. सूर्यकुमार यादवच्या या विधानामागील कारण म्हणजे टीम इंडियाच्या खेळाडूंची कामगिरी आणि ड्रेसिंग रूममधील वातावरण. खेळाडूंची क्षमता आणि आत्मविश्वास यामुळे आपलं काम सोपं झाल्याचं सूर्याकुमार यादवने मान्य केलं. 


सूर्याच्या म्हणण्यानुसार, त्यांना फक्त त्यांच्या क्षमतांचा योग्य वापर करत राहावं लागणार आहे. तो म्हणाला की, ड्रेसिंग रूममधील वातावरणामुळे तो आनंदी आहे, जिथे प्रत्येक खेळाडू एकमेकांच्या कामगिरीचा आनंद साजरा करणार आहे.


सूर्या ठरला मॅन ऑफ द सिरीज


कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची ही पहिली सिरीज होती. सूर्याने आपल्या पहिल्या नेतृत्वात भारताला विजयी केलं. सूर्याने या सिरीजमध्ये बॅटिंगसह आपल्या बॉलिगंनेही चमक दाखवली. तिसऱ्या सामन्यात 20 वी ओव्हर फेकत सूर्याने 2 विकेट्सही घेतल्या. सूर्याला या सिरीजमधील तिन्ही सामन्यात केलेल्या कामगिरीसाठी 'मॅन ऑफ द सिरीज' हा अवॉर्डही देण्यात आला.