Rahul Dravid On extension as head coach : बीसीसीआयने टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ वाढवल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांची नियुक्ती किती कालावधीसाठी असेल यावर बीसीसीआयने (BCCI) कोणतीही तारीख जाहीर केली नाही. पुढील वर्षी होणार्‍या टी-20 वर्ल्ड कपपर्यंत राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहील का? असा सवाल देखील विचारला जाऊ लागला होता. अशातच आता राहुल द्रविड यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर बीसीसीआय फक्त कागदी घोडे नाचवतंय का? असा सवाल विचारला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडे वर्ल्ड कप संपल्यानंतर द्रविड यांच्यासह सर्व स्टार सदस्यांचा कार्यकाळही संपुष्टात आला होता, अशा परिस्थितीत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बदलले जातील अशी चर्चा सुरु होती, मात्र बीसीसीआयने पुन्हा एकदा राहुल द्रविडची नियुक्ती केली. विश्वचषकानंतर द्रविड यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बोर्डाने त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला, असं बीसीसीआयने निवेदनात सांगितलं होतं. मात्र, राहुल द्रविड यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नसल्याचं समोर आलं आहे. 


पत्रकारांशी बोलताना राहुल द्रविड यांनी बीसीसीआयच्या करारावर भाष्य केलंय. 'मी अद्याप बीसीसीआयच्या कोणत्याही करारावर स्वाक्षरी केलेली (I have not yet signed papers) नाही, अशी प्रतिक्रिया आज  बीसीसीआयच्या आढावा बैठकीनंतर राहुल द्रविड यांनी दिली. कागदपत्रे मिळाल्यावर मी ते बघून बघेन, असं राहुल द्रविड (Rahul Dravid On extension as head coach) यांनी म्हटलं आहे.


पाहा Video



दरम्यान, बीसीसीआय गुजरात टायटन्सचा कोच आण टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट आशिष नेहरा याला भारतीय टी-ट्वेंटी संघाचे प्रशिक्षक बनवू इच्छित होते, परंतु नेहराने भारतीय टी-ट्वेंटी संघाचे प्रशिक्षक बनण्यास नकार दिल्याची माहिती देखील समोर आली होती.