Suryakumar Yadav Statement: वर्ल्डकपनंतर टीम इंडियाची पहिली टी-20 सिरीज ऑस्ट्रेलिया सोबत सुरु आहे. गुरुवारी या सिरीजमधील ( Ind vs Aus First T20 ) पहिला टी-20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) ऑस्ट्रेलियाचा 2 विकेट्सने पराभव केला. यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) आणि ईशान किशन यांनी तुफान फलंदाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) आणि इशान किशन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर जोश इंग्लिसची शतकी खेळी व्यर्थ घालवली. सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav ) 42 बॉल्समध्ये 80 रन्सची खेळी केली. यावेळी सूर्याने 9 फोर आणि 4 सिक्स लगावले. तर इशान किशनने 39 बॉल्समध्ये 58 रन्सची खेळी केली. यावेळी 8 विकेट्स गमावत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाने दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं. 


विजयानंतर काय म्हणाला सूर्यकुमार?


ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला T20 सामना जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) फार खूश दिसत होता. सामन्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये सूर्यकुमार यादव म्हणाला, 'टीममधील खेळाडूंनी या सामन्यात ज्या प्रकारे खेळ केला त्यामुळे मी खूप खूश आहे. आम्ही प्रेशरखाली होतो, पण सर्व मुलांनी ज्या प्रकारे कामगिरी केली ते आश्चर्यकारक होतं. मला या क्षणाचा फार अभिमान आहे की, ज्यावेळी तुम्ही खेळता तेव्हा भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा विचार करता. या ठिकाणी येऊन भारताचा कर्णधार होणं हा मोठा क्षण आहे.'


'या' खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय


कर्णधार सूर्यकुमार ( Suryakumar Yadav ) म्हणाला, "आम्हाला वाटलेलं की, थोडे दव पडेल, पण तसं झालं नाही. मला माहिती होतं की फलंदाजी करणे सोपे होईल. या सामन्यात गोलंदाजांनी खरोखरच चांगली कामगिरी केली. फ्रँचायझी क्रिकेटमध्ये आम्ही अनेकवेळा अशा परिस्थितीत आलो आहोत. क्रीझवर असताना मी फक्त ईशान किशनला फक्त स्वतःच्या खेळाचा आनंद घेण्यास सांगितलं. पुढे काय काय होणार आहे हे आम्हाला माहीत होतं." 


मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. स्टेडियममध्ये वातावरण चांगलं होतं, त्यासाठी चाहत्यांचे आभार. रिंकूचा खेळ पाहून खूप छान वाटल्याचंही सूर्या म्हणाला.