SL vs PAK: यंदाच्या वर्षीही पाकिस्तानच्या टीमचं एशिया कप ( Asia Cup 2023 ) जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. गुरुवारी झालेल्या पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका यांच्या सामन्यामध्ये श्रीलंकेने 2 विकेट्सने पाकिस्तानचा पराभव केला. हा सामना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगला होता. एका बॉलमध्ये 2 रन्स हवे असताना श्रीलंकेचा विजय झाला. दरम्यान या विजयामुळे श्रीलंकेच्या टीमला फायनलचं तिकीट मिळालं आहे. या सामन्यानंतर पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझमने पराभवाचं मुख्य कारण स्पष्ट केलंय.


Babar Azam ने सांगितलं पराभवाचं मुख्य कारण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया कप ( Asia Cup 2023 ) 2023 चा प्रवास पाकिस्तान टीमसाठी चढ-उतारांनी भरलेला होता. नेपाळचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानच्या टीमला भारताकडून 228 रन्सने पराभव स्वीकारावा लागला. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या टीमने 5 मोठे बदल केले होते. पराभवानंतर बाबर आझमने कबूल केलं की, फिल्डींग आणि गोलंदाजीमध्ये काही त्रुटी असल्याचं सांगितलं आहे.


सामना झाल्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये बाबर आझम ( Babar Azam ) म्हणाला, आम्ही शाहीनला 41 वी ओव्हर टाकण्यास सांगितली होती. यावेळी शेवटच्या ओव्हरसाठी मी झमानवर विश्वास ठेवला होता. यावेळी श्रीलंकेने खूप चांगला खेळ केला. ते नक्की आमच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळले. 


बाबर ( Babar Azam ) पुढे म्हणाला, गोलंदाजी आणि फिल्डींग मध्ये आम्हाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान या गोष्टींमुळेच आम्ही सामना गमावला. मधल्या काही ओव्हर्समध्ये आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही. श्रीलंकेची ती एक पार्टनरशिप आम्हाला महागात पडली."


पराभवानंतर बाबरला अश्रू अनावर


पाकिस्तानला टीम इंडियाविरूद्ध मात्र त्यांना चांगला खेळ करता आला नाही. यावेळी भारत आणि पाकिस्तान ( Ind vs Pak ) फायनलमध्ये येणार अशी अटकळ बांधली जात होती. मात्र श्रीलंकेने केलेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा एशिया कपमधील प्रवास संपुष्टात आला. यानंतर सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझमचे ( Babar Azam )  डोळे पाणावलेले असल्याचं दिसून येतंय. हा व्हिडीओ पाहून बाबर आझमचे चाहतेही हळहळलेत. 


पाकिस्तानचा श्रीलंकेकडून पराभव


पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना 42 ओव्हर्समध्ये 252 रन्स केले. पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्यातील ओव्हर्समध्ये कपात करण्यात आली. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने झंझावाती खेळी केली. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा सामना करताना कुसल मेंडिसने 91 रन्सची खेळी केली. अखेरीस चरित असलंकाने 49 रन्स करत श्रीलंकेच्या टीमला अंतिम फेरीचं तिकीट मिळवून दिलं.