Cheteshwar Pujara: टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज चेतेश्वर पुजाराने ( Cheteshwar Pujara ) नुकतंच काऊंटी क्रिकेटमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी तो ससेक्स टीमच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत होता. दरम्यान यावेळी ससेक्स आणि लीसेस्टरशायर सामन्यादरम्यान नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने ( England cricket Board ) त्याला सस्पेंड केलं. सस्पेंड केल्यानंतर पहिल्यांदाच चेतेश्वर पुजाराने विधान केलं आहे.


काय आहे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय फलंदाज पुजारावर ( Cheteshwar Pujara ) त्याच्या टीमने नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलीये. आता चेतेश्वर पुजारा आगामी सामन्यात खेळू शकणार नाही. काउंटी चॅम्पियनशिप 2023 मध्ये ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबच्या खात्यातून 12 गुण देखील कापले गेलेत. यंदाच्या मोसमात चौथ्यांदा दंड आकारल्यामुळे ससेक्सविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. संघाचा कर्णधार चेतेश्वर पुजाराने ( Cheteshwar Pujara ) कोणताही युक्तिवाद न करता आरोप मान्य केले आहेत.


निलंबनावर काय म्हणाला चेतेश्वर पुजारा? 


चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara ) म्हणाला की, असं सोडून जावं लागत असल्याचं मला दुःख आहे. पण काऊंटीच्या चांगल्या आठवणी सोबत आहेत मी त्या कधीही विसरणार नाहीत. टीमने दाखवलेल्या धैर्याचा आणि चारित्र्याचा मला अभिमान आहे. उर्वरित सामन्यांसाठी ससेक्सला शुभेच्छा.' 


चेतेश्वर पुजाराने या सिझमनध्ये 7 लिस्ट ए सामन्यांमध्ये ससेक्ससाठी 384 रन्स केले आहेत. यामध्ये 2 शतकं आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे. 


WTC फायनलमध्ये पुजारा होता बाहेर


गेल्या काही दिवसांपासून चेतेश्वर पुजाराला ( Cheteshwar Pujara ) टीम इंडियामध्ये जागा मिळत नाहीये. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यामध्येही त्याला संधी देण्यात आली नव्हती. WTC फायनलमध्ये खराब कामगिरीनंतर टीममधून वगळलेला तो भारताचा एकमेव मोठा फलंदाज होता. यावेळी टीममध्ये तरुणांना संधी देण्याच्या प्रयत्नामध्ये पुजाराला ( Cheteshwar Pujara ) टीमधून वगळण्यात आले.


कसं आहे चेतेश्वर पुजाराचं करियर?


चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara ) गेल्या दशकापासून भारतीय टेस्ट फलंदाजीचा मजबूत आधारस्तंभ मानला जातो. या काळात त्याने देशात आणि जगभरात टेस्ट क्रिकेटमध्ये मिळवलेल्या यशात महत्त्वाची भूमिका बजावलीये. टीम इंडियासाठी त्याने 103 टेस्ट सामने खेळले आहेत. यावेळी त्याने 176 डावांमध्ये 3 द्विशतकं आणि 35 अर्धशतकांसह 19 शतकांसह 7195 रन्स केले आहेत.