ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज माजी खेळाडूकडून कोहलीचं कौतुक
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर इयान चॅपल यांनी परदेशात जावून टीम इंडियाने मिळवलेल्या यशाबद्दल भारताचा कर्णधार विराट कोहलीचं कौतुक केलं आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर इयान चॅपल यांनी परदेशात जावून टीम इंडियाने मिळवलेल्या यशाबद्दल भारताचा कर्णधार विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. भारताने रविवारी न्यूझीलंडचा शेवटच्या सामन्यात पराभव करत सीरीज ५-० ने जिंकत व्हाईट वॉश दिला. चॅपल यांनी म्हटलं की, 'जेव्हा तो पहिल्यांदा कर्णधार झाला होता. खास करुन टेस्ट टीमचा, मला वाटलं होतं की, भावनात्मक स्वभाव त्याच्या नेतृत्व स्वभावाला हानिकारक ठरु शकते. याच्या उलट त्याने त्याच्या भावना अशा जपल्या की त्या संघाच्या विरोधात नाही गेल्या. असं यामुळे शक्य झालं कारण त्याचा दृष्टीकोन स्पष्ट आहे.'
चॅपल यांनी पुढे म्हटलं की, भारतीय टीम कोहलीच्या नेतृत्वात बहुमुखी प्रतिभा असलेली धनी झाली आहे. ज्यामुळे परदेशात त्यांनी चांगली कामगिरी केली. कोहलीच्या नेतृत्वात भारत चांगली कामगिरी करत आहे. वेगवेगळ्या आव्हानांमध्ये देखील विजय मिळवत आहेत. टीममध्ये विजयाची मानसिकता तयार करण्यासाठी याचं श्रेय कर्णधार विराट कोहलीला जातं. टीम पराभवाच्या जबड्यातूनही विजय मिळवते. तेव्हा हा चमत्कारी खेळाडू आहे असंच म्हटलं आहे.
भारताने न्यूझीलंडचा ५-० ने पराभव करत इतिहास रचला होता. टी-२० इंटरनॅशनलच्या इतिहासात टीम इंडियाने पहिल्यांदाच टी-२० सीरीज जिंकली होती. द्विपक्षीय टी-२० सीरीजमध्ये ५-० ने विजय मिळवणारी पहिली टीम बनली आहे. आता दोन्ही संघामध्ये ३ सामन्यांची वनडे सीरीज होणार आहे. ५ फेब्रुवारीपासून याची सुरुवात होणार आहे.
आताच्या आणखी काही सर्वात महत्त्वाची बातम्या
आसाममध्ये नदीला आग, तीन दिवसांपासून धगधगतेय
...आता पॅन कार्ड काढणं अधिक सोप्पं
जगातील कोणत्याच बाप-लेकीसोबत असं घडू नये
'महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग'
दिग्दर्शकाच्या मदतीसाठी पुढे सरसावला खिलाडी कुमार