डॉग वॉकसाठी अख्ख स्टेडिअम केलं रिकामं, IAS अधिकाऱ्याच्या कृतीनं खेळाडू संतापले
दिल्लीतील एका IAS अधिकाऱ्याला निव्वळ आपल्या कुत्र्याला फिरवता यावे यासाठी संपुर्ण स्टेडिअम रिकाम कराव लागत असल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई : ऑलिम्पिकची तयारी म्हटलं तर 24 तास जीवतोड मेहनत आलीचं. त्यात भारतात आधीचं सोयीसुविधांची वाणवा असल्याने असंख्य अॅथलीट्सना विना स्टेडिअमचं तयारी करावी लागते. आणि सोयीसुविधा असताना देखील या स्टेडिअमचा खेळाडूंना फायदा होत नसल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील एका IAS अधिकाऱ्याला निव्वळ आपल्या कुत्र्याला फिरवता यावे यासाठी संपुर्ण स्टेडिअम रिकाम कराव लागत असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवर आता अनेक अॅथलीट्स संताप व्यक्त करतायत.
प्रकरण काय ?
दिल्लीत भलमोठं त्यागराज स्टेडिअम आहे. या स्टेडिअमध्ये असंख्य खेळाडू दररोज प्रॅक्टीस करत असतात. दररोज या स्टेडिअममध्ये सायंकाळी 8.30 पर्यंत खेळाडू सराव करतात, मात्र आता हे स्टेडिअम 7 वाजता रिकाम करण्यात येते. या घटनेमुळे प्रशिक्षक आणि खेळाडू फार वैतागतात.
दिल्लीचे IAS अधिकारी संजीव खिरवार यांच्या पाळीव कुत्र्यामुळे त्यागराज स्टेडिअम दररोज संध्याकाळी ७ वाजता रिकामे करत असल्याचा खळबळजनक आरोप एका प्रशिक्षकाने केला आहे. संजीव खिरवार रोज आपल्या कुत्र्यासोबत फिरायला स्टेडिअमध्ये येतात. या कारणामुळे संपूर्ण स्टेडिअम रिकामे करण्यात येते. या घटनेमुळे अॅथलीट्सचा व्यवस्थित सरावही होत नाही. तसेच प्रशिक्षकांनाही कोचिंग देण्यात अडचणी येतात. त्यामुळे कोच आणि अॅथलीट्स या घटनेवरून नाराज आहेत.
आरोप फेटाळले
स्टेडिअममध्ये माझ्या चालण्याने अॅथलीटसच्या सरावात कुठलीही अडचण येत नसस्याचे संजीव खिरवार यांनी म्हणत सर्व आरोप फेटाळून लावले.
स्टेडिअमचे प्रशासक आरोपांवर काय म्हणाला ?
स्टेडिअमचे प्रशासक अनिल चौधरी यांनी देखील सर्व आरोप फेटाळले आहेत. अनिल चौधरी यांनी सांगितले की, स्टेडिअमवर अधिकृत वेळेचे पालन केले जात आहे. स्टेडिअमवर खेळाडूंसाठी अधिकृत प्रशिक्षणाची वेळ संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर, प्रशिक्षक आणि खेळाडू निघून जातात. त्यामुळे आम्ही कोणत्याही खेळाडूला लवकर निघण्यास सांगितले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोण आहेत आयएएस अधिकारी ?
आयएएस अधिकारी संजीव खिरवार 1994 च्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्या दिल्लीत महसूल आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. दिल्लीचे सर्व डीएम त्यांच्या हाताखाली काम करतात. दिल्लीच्या पर्यावरण विभागाचे सचिव देखील आहेत.
खिरवार यांनी बी-टेक कॉम्प्युटर इंजिनीअरिंग केली आहे. अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवीही घेतली आहे. त्यांनी चंदीगडमध्ये एसडीएम म्हणून करिअरला सुरुवात केली. यासह खिरवार यांनी दिल्ली, गोवा, अंदमान आणि निकोबार, अरुणाचल प्रदेश तसेच भारत सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. यापूर्वी दिल्लीत त्यांची व्यापार आणि कर आयुक्त म्हणूनही नियुक्ती झाली आहे.
दरम्यान या प्रकरणावर अद्याप दोन्हीकडच्या बाजू समोर आल्या आहेत. मात्र जर खरचं स्टेडीयमवर कुत्र्याला फिरवले जात असेल तर ही घटना अशोभनीय आहे. स्टेडीयम ही कुत्रा फिरवण्याची जागा नाही आहे. स्टेडियमवर बनवलेली मैदाने ही खेळाडूंसाठी बनवली आहेत. त्यामुळे जर या घटनेत आयएएस अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी खेळाडूंमधून जोर धरतेय.