Women T20 World Cup 2024 Schedule : सर्वांना प्रतिक्षा असलेल्या वुमेन्स क्रिकेट टी-ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा 2024 चं वेळापत्रक जाहीर झालं आहे. आयसीसीने सोशल मीडिया अकाऊंटवर याची माहिती दिली. या स्पर्धेत एकूण 10 संघात 23 सामने खेळवले जाणार आहेत. वुमेन्स क्रिकेटच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं यजमानपद बांगलादेशकडे आहे. तर ढाका आणि सिल्हेटमध्ये पार पडणार आहेत. दोन ग्रुपमध्ये संघ विभागले गेले असून भारत पहिल्या गटात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पर्धेत भाग घेत असलेल्या एकूण 10 संघांना दोन गटात म्हणजेच 5-5 असं विभागलं गेलं आहे. पहिल्या गटात ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूजीलँड, पाकिस्तान, क्वालीफायर 1 मध्ये पात्र ठरलेला संघ असेल. तर दुसऱ्या गटात साउथ अफ्रीका, इंग्लंड, वेस्टइंडीज, बांग्लादेश आणि क्वालीफायर 2 मध्ये पात्र ठरलेला संघ असणार आहे. या दोन्ही संघातून टॉप 2 संघ निवडले जातील. त्या 4 संघांमध्ये सेमीफायनल खेळवला जाईल. त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी अखेरचा फायनल सामना खेळवला जाणार आहे.


ग्रुप ए: ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूजीलँड, पाकिस्तान, क्वालीफायर 1
ग्रुप बी : साउथ अफ्रीका, इंग्लंड, वेस्टइंडीज, बांग्लादेश, क्वालीफायर 2


टी20 वर्ल्ड कप 2024 चं शेड्यूल


3 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध साउथ अफ्रीका, ढाका
3 ऑक्टोबर: बांग्लादेश विरुद्ध क्वालीफायर 2, ढाका
4 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालीफायर 1, सिलहट
4 ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूजीलँड, सिलहट
5 ऑक्टोबर: साउथ अफ्रीका विरुद्ध वेस्टइंडीज, ढाका
5 ऑक्टोबर: बांग्लादेश विरुद्ध इंग्लंड, ढाका
6 ऑक्टोबर: न्यूजीलँड विरुद्ध क्वालीफायर 1, सिलहट
6 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान, सिलहट
7 ऑक्टोबर: वेस्टइंडीज विरुद्ध  क्वालीफायर 2, ढाका
8 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, सिलहट
9 ऑक्टोबर: बांग्लादेश विरुद्ध वेस्टइंडीज, ढाका
9 ऑक्टोबर: भारत विरुद्ध क्वालीफायर 1, सिलहट
10 ऑक्टोबर: साउथ अफ्रीका विरुद्ध क्वालीफायर 2, ढाका
11 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूजीलँड, सिलहट
11 ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध क्वालीफायर 1, सिलहट
12 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध वेस्टइंडीज, ढाका
12 ऑक्टोबर: बांग्लादेश विरुद्ध  साउथ अफ्रीका, ढाका
13 ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध न्यूजीलँड, सिलहट
13 ऑक्टोबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिलहट
14 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध  क्वालीफायर 2, ढाका 
17 ऑक्टोबर: पहिला सेमीफाइनल, सिलहट
18 ऑक्टोबर: दुसरा सेमीफाइनल, ढाका
20 ऑक्टोबर: फाइनल, ढाका