T20 वर्ल्ड कपसाठी ICC ने जाहीर केली बेस्ट ओपनिंग जोडी; पाहा रोहित आणि के.एल कोणत्या स्थानावर?
ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या T20 वर्ल्डकप 2022 साठी सर्व 16 टीम्सच्या टॉप ओपनिंगची रँकिंग जारी केली आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या T20 वर्ल्डकप 2022 साठी सर्व 16 टीम्सच्या टॉप ओपनिंगची रँकिंग जारी केली आहे. मुख्य बाब म्हणजे, भारताचा रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना दुसऱ्या क्रमांकावर ठेवण्यात आलंय. तर आयसीसीने पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना स्पर्धेतील बेस्ट ओपनर्स म्हणून घोषित केलं आहे.
पाकिस्तानचा ओपनर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीने त्यांच्या दमदार फलंदाजीने चाहत्यांच्या मनावर अनोखी छाप सोडलीये. पाकिस्तानची संपूर्ण टीम पूर्णपणे या दोन खेळाडूंवर टिकून आहे. सुरुवातीला मोठी खेळी न खेळता हे दोघं बाद झाले तर त्यांच्या मिडल ऑर्डरमधील फळीतील फलंदाज पाकिस्तानला पराभवापासून वाचवू शकणार नाहीत.
यामुळेच आयसीसीने पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना सलामीच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर ठेवलंय. बाबरने शेवटच्या 5 सामन्यांमध्ये 43 च्या सरासरीने आणि 130 च्या स्ट्राइक रेटने 4, 87 *, 9, 36, 8 रन्स केलेत. तर मोहम्मद रिझवानने पाच डावात 52.33 च्या सरासरीने आणि 128 च्या स्ट्राइक रेटने 1, 63, 88, 8, 88* रन्स केलेत.
केएल राहुल आणि रोहित जोडीला दुसरं स्थान
भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल भारतीय टीमच्या वतीने ओपनिंग करतात. आयसीसीने या सलामीच्या जोडीला दुसऱ्या स्थानावर ठेवलंय. भारतीय सलामीवीरांची खास गोष्ट म्हणजे राहुल आणि रोहित यांनी 140 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केलीये.
यावरून हे स्पष्ट होतंय, दोन्ही भारतीय खेळाडू वेगवान फलंदाजी करताना विरोधी टीमवर दडपण आणण्यात बऱ्याच अंशी यशस्वी होतात. दोन्ही खेळाडूंच्या शेवटच्या पाच T20 सामन्यांमध्ये फलंदाजी करताना, भारतीय ओपनर्सने त्यांच्या शेवटच्या 5-5 सामन्यांमध्ये 280 रन्स केलेत.
अॅरॉन फिंच आणि डेव्हिडच्या जोडीला धक्का
आयसीसीने न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे आणि मार्टिन गप्टिल यांना तिसऱ्या क्रमांकावर ठेवलंय. तर ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीला चौथ्या क्रमांकावर ठेवल्याने त्यांना मोठा धक्का बसलाय. एरॉन फिंच एकही मोठी इनिंग खेळू शकला नाही. त्यामुळे या सलामीच्या जोडीला चौथ्या क्रमांकावर ठेवण्यात आलंय.