मुंबई : २०१०-२०१९ या दशकात क्रिकेट जगतामध्ये अनेक घडामोडी घडल्या.  अनेक विक्रमांची नोंद झाली. आयसीसीनेही या दशकातला सर्वोत्तम कर्णधार कोण? असा प्रश्न चाहत्यांना विचारला. हा प्रश्न विचारल्यानंतर बहुतेक चाहत्यांनी धोनी हेच उत्तर दिलं. धोनीने २०१४ साली टेस्ट टीमचं आणि २०१७ साली वनडे टीमचं कर्णधारपद सोडलं होतं.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप, २०११ सालचा ५० ओव्हरचा वर्ल्ड कप आणि २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. या तिन्ही आयसीसी स्पर्धा जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे.


धोनीच्या नेतृत्वात भारताने २०० वनडे मॅच खेळल्या. यातल्या ११० मॅचमध्ये भारताचा विजय आणि ७४ मॅचमध्ये पराभव झाला. धोनीच्या नेतृत्वात भारताच्या ५ मॅच टाय झाल्या आणि ११ मॅचचा निकालच लागला नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये धोनीने नेतृत्व केलेल्या ६० पैकी २७ मॅच भारताने जिंकल्या, तर १८ मॅचमध्ये भारताचा पराभव झाला आणि १५ मॅच ड्रॉ झाल्या.