चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्यफेरीची उत्सुकता
आजपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या लढती होणार आहेत.
नवी दिल्ली : आजपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या लढती होणार आहेत.
यातील पहिली लढत आज यजमान इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात कार्डीफमध्ये तर उद्या भारत आणि बांगलादेश यांच्या बर्मिंगहॅमच्या मैदानात दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे.
आजच्या लढतीत इंग्लंडचं पारडं जड मानलं जातंय. पण त्यांच्यासमोर पाकिस्तानचं कडवं आव्हान असणार आहे... इंग्लंडनं बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा अशा तिघांचाही पराभव केलाय.
तर पाकिस्ताननं श्रीलंकेवर तीन गडी राखून निसटती मात केली, तर दक्षिण अफ्रिकेवर डकवर्थ लुईसच्या आशीर्दवादानं पाकला उपांत्य फेरीत जागा मिळालीय. पण क्रिकेट विश्वातला सगळ्या 'अनप्रेडिक्टेबल' संघ अशी पाकिस्तानची ख्याती आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या इंग्लंडला आपलं सातत्य टिकवणं महत्वाचं ठरणार आहे.