भारताचा बांगलादेशसमोर धावांचा डोंगर, कार्तिक-हार्दिक चमकले...
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर ३२५ धावांचे आव्हान ठेवले आहे.
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर ३२५ धावांचे आव्हान ठेवले आहे.
भारताकडून दिनेश कार्तिकने ९४, पांड्याने ८० आणि शिखर धवन याने ६० धावांची शानदार खेळी केली.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीस पाचारण केले. भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी सुरूवात केली. पण दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर रोहित शर्मा १ धावेवर बाद झाला. आयपीएलचा खराब फॉर्म आजही रोहितचा कायम राहिला. त्याला रुबेल याने क्लिन बोल्ड केले.
त्यानंतर शिखरच्या साथीला आलेला अजिंक्य राहणे चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने एक शानदार स्ट्रेट ड्राइव्ह चौकारही लगावला. पण त्याला मुस्तफिजुर याने क्लिन बोल्ड केले. त्याने २१ चेंडूत ११ धावा काढल्या.
शिखर धवनने चॅम्पियन्स ट्रॉफीमधील फॉर्म कायम ठेवत ६७ चेंडूत ७ चौकारांसह ६० धावा केल्या. केदार जाधव यानेही चांगळी फलंदाजी केली पण त्याला जास्त धावा करता आल्या नाही. त्याने ३८ चेंडूत २ चौकार आणि एक षटकारसह ३१ धावा केल्या.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात गोलंदाजीमध्ये खराब कामगिरी करून मोठी चूक करणाऱ्या हार्दिक पांड्याने दुसऱ्या सामन्यात बांगलादेश विरूद्ध ८० धावांची नाबाद खेळी करून संघात आपली जागा फिक्स केली.
हार्दिक पांड्याने ५४ चेंडूत ६ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ८० धावा कुटल्या. पहिल्या सामन्यात खराब गोलंदाजीमुळे हार्दिक पांड्यावर दडपण होते. त्यामुळे सुरूवातीला त्याने सावध खेळी केली. मग त्याने खऱ्या अर्थाने आपला जलवा दाखविला. रविंद्र जडेजाच्या मदतीने त्याने भारताला ३०० धावांच्या आसपास आणून ठेवले.
भारताने ५० षटकात ७ बाद ३२४ धावांचा डोंगर बांगलादेशसमोर रचला आहे.
बांगलादेशकडून रुबेल हुसैन याने ३, सनझुमूल इस्लाम याने २ आणि मुस्तफिजुर याने एक विकेट घेतली.
दिनेश कार्तिकने केले संधीचे सोने...
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकने या संधीचे सोने केले. त्याने ७७ चेंडूत ९४ धावांची खेळी केली.
सराव सामन्यात सर्वांनी फलंदाजीची संधी मिळावी यासाठी त्याला रिटायर्ट आऊट करण्यात आले. त्यामुळे त्याचे शतक अवघ्या ६ धावांनी हुकले.
भारताची खराब सुरूवात झाली, सातव्या ओव्हरमध्ये २१ धावांमध्ये २ गडी गमावले होते. त्यानंतर शिखर धवनची साथ द्यायला आलेल्या दिनेश कार्तिकने ८ चौकार आणि आणि एक षटकारासह ९४ धावांची शानदार खेळी केली.
मनीष पांडे जखमी झाल्यामुळे १५ जणांच्या संघात दिनेश कार्तिकला संधी मिळाली. पहिल्या सामन्यात त्याला अपयश आले होते. तो शून्यावर बाद झाला होता. पण आज त्याने संधीचे सोने केले.
चॅम्पियन्स ट्रॉफी : हार्दिक पांड्याने जागा फिक्स केली...
चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात गोलंदाजीमध्ये खराब कामगिरी करून मोठी चूक करणाऱ्या हार्दिक पांड्याने दुसऱ्या सामन्यात बांगलादेश विरूद्ध ८० धावांची नाबाद खेळी करून संघात आपली जागा फिक्स केली.
हार्दिक पांड्याने ५४ चेंडूत ६ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ८० धावा कुटल्या. पहिल्या सामन्यात खराब गोलंदाजीमुळे हार्दिक पांड्यावर दडपण होते. त्यामुळे सुरूवातीला त्याने सावध खेळी केली. मग त्याने खऱ्या अर्थाने आपला जलवा दाखविला. रविंद्र जडेजाच्या मदतीने त्याने भारताला ३०० धावांच्या आसपास आणून ठेवले.
भारताने ५० षटकात ६ बाद ३२४ धावांचा डोंगर बांगलादेशसमोर रचला आहे.
पहिल्या सामन्यात झाली होती पांड्याकडून ही चूक
चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना भारताने जिंकला असला तरी यात भारताचा युवा स्टार हार्दिक पांड्याने एक मोठी चूक केली त्यामुळे आता त्याच्या हातून एक सुवर्णसंधी हिसकावून घेतली जाऊ शकते.
एक्सपर्टनुसार पांड्याने गोलंदाजीवेळी केलेल्या चुकीमुळे त्याला गोलंदाज म्हणून संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तो टीममध्ये असेल पण फलंदाज म्हणून असू शकतो. पण कर्णधार विराट कोहली त्याला तेज गोलंदाज म्हणून संधी देणार नाही. हार्दिकने ज्या लेंथवर गोलंदाजी केली, ती लेंथ ब्रिटीश पिचवर यशस्वी ठरत नाही.
पहिल्या सामन्यात पांड्याने एकूण ६ ओव्हर टाकल्या त्यात त्याने ४९ धावा दिल्या. ल्यूक रॉंकी आणि केन विल्यमसन यांनी खूप धावा काढल्या. कोहली आणि भारतीय संघाचा कोच अनिल कुंबळे याला वाटते की हार्दिक आपली लेंथमध्ये बदल केला नाही. भुवनेश्वर, शमी आणि उमेश यादव याने ज्या प्रकारे गोलंदाजी केले, तसे करण्यात हार्दिक कमी पडला.