बर्गर, पिझ्झाहून स्वस्त Champions Trophy 2025 ची तिकीट; किंमत पाहून हैराण व्हाल

Sports News : इतक्या कमी किमतीत क्रिकेट सामन्याची तिकीटं? Champions Trophy 2025 च्या तिकीट विक्रीचीच सर्वत्र चर्चा...
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी ही बहुप्रतिक्षित क्रिकेट स्पर्धा अवघ्या काही दिवसांमध्ये पार पडणार असून, त्यासाठीची तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे. 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून, त्यासाठीची तिकीट बुकिंगही आता सुरू झाली आहे. ICC कडूनच या स्पर्धेच्या तिकीट विक्रीसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली असून, तिकीटाचे दर पाहून क्रिकेटप्रेमी हैराण होत आहेत.
एकिकडे स्पर्धा तोंडावर आलेली असतानाच अद्यापही काही गोष्टींवर मात्र साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वतयारीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा घाम निघत असतानाच सामान्यांच्या तिकीटाचे दर अनेकांनाच विचार करायाला भाग पाडत आहेत. कारण, पिझ्झा आणि बर्गरहूनही हे दर कमी असल्याचं आता पाहायला मिळत आहे.
Champions Trophy दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे सर्व सामने दुबईमध्ये पार पडणार असून, त्यासाठीची तिकीट विक्री अद्याप सुरू झालेली नाही. पण, तिथं आयसीसीकडून मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या तिकीटांचे दर निर्धारित केले आहेत. अधिकृत माहितीनुसार तिकीटाचे किमान दर 1000 पाकिस्तानी रुपये अर्थात (310 भारतीय रुपये) निश्चित करण्यात आले असून, प्रिमियम श्रेणीतील तिकीट दर 1500 पाकिस्तानी रुपये म्हणजेच (465 भारतीय रुपये) इतक्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आलं आहे. भारतीय चलनानुसार या तिकीटांची किंमत पाहिल्यास इथं पिझ्झा आणि बर्गरपेक्षा कमी किमतीत तिथं क्रिकेट सामन्याची तिकीट मिळतेय हेच स्पष्ट होत आहे.
VIP तिकीटांचे दर
कराची- 7000 PKR (2171 भारतीय रुपये)
लाहोर - 7500 PKR (2326 भारतीय रुपये)
बांगलादेश - 12500 PKR (3877 भारतीय रुपये)
हेसुद्धा वाचा : घातक! पुढील 4 वर्षांत कोरोनासारखीच महामारी येणार; बिल गेट्स यांनी वाढवली जगाची चिंता
उपांत्य फेरीतील सामना आणि अंतिम सान्यासंदर्भातील Update समोर
चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामना 9 मार्च रोजी पार पडणार असून, या सामन्याची तिकीटं दुबईत खेळवल्या जाणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. 1996 नंतर पाकिस्तानमध्ये वैश्विक स्तरावरील इतक्या मोठ्या स्पर्धेतं मोठ्या काळानंतर आयोजन होत असल्यामुळं सध्या या देशात यंत्रणा सर्व परिंनी प्रयत्न करत व्यवस्थापनामध्ये कुठेही त्रुटी राहणार नाहीत यासाठीच कार्यरत असल्याचं पाहायला मिळत आहे.