आयसीसी वर्ल्डकप २०१९ चं काउंटडाउन सुरु
इंग्लंडमध्ये रंगणार २०१९ चा वर्ल्डकप
मुंबई : आयसीसी वर्ल्ड कप २०१९ चं काउंटडाऊन सुरु झालं आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या इंग्लंडमध्ये वर्ल्डकप रंगणार आहे. १४९ दिवसांनी ओव्हलच्या मैदानात ३० मेला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा सामना रंगणार आहे. ४६ दिवस चालणाऱ्या या वर्ल्डकपची फायनल १४ जुलैला रंगणार आहे. यंदाचा हा १२ वा वर्ल्डकप आहे. या वर्ल्डकपमध्ये १० टीम भाग घेणार आहेत. इंग्लंड पाचव्यांदा वर्ल्डकपचा यजमानपद भूषवत आहे. याआधी १९७५, १९७९, १९८३, १९९९ आणि २००६ मध्ये वर्ल्डकप इंग्लंडमध्ये खेळला गेला आहे. या वर्ल्डकपमध्ये अफगानिस्तान पहिल्यांदाच भाग घेणार आहे. अफगानिस्तानला २०१८ मध्ये टेस्ट टीमचा दर्जा देखील मिळाला आहे. त्यामुळे अफगानिस्तानसाठी हा ऐतिहासिक वर्ल्डकप असणार आहे.
जिम्बॉब्वे आणि आयरलँड टीम यंदा क्वालीफाय नाही करु शकली. इंग्लंडने सर्वाधिक वेळा वर्ल्डकपचं यजमानपद भूषवलं आहे पण त्यांना एकदाही वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. १९७९, १९८७ आणि १९९२ मध्ये फायनलमध्ये पोहोचले होते. भारताचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात होणार आहे. हा सामना साउथम्प्टनमध्ये खेळला जाणार आहे. भारताचा १६ जूनला पाकिस्तानशी सामना होणार आहे. हा सामना मॅनचेस्टरमध्ये खेळला जाणार आहे. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान कधीच भारताला पराभूत करु शकलेला नाही.
भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, बांग्लादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्टइंडीज या टीम क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. यंदाचा वर्ल्डकप हा राउंड रॉबिन फॉरमॅटमध्ये होणार आहे. १९९२ नंतर पहिल्यांदाच या फॉरमॅट वर्ल्डकप होत आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये प्रत्येक टीम कमीत कमी ९ सामने खेळणार. फायलनमध्ये पोहोचणाऱ्या दोन्ही टीम ११ सामने खेळेल. फायनल सामना लॉर्ड्समध्ये खेळला जाणार आहे. भारताने २ वेळा वर्ल्डकप जिंकला आहे. पहिल्यांदा १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात तर २०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वात.
ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ५ वेळा वर्ल्डकप जिंकला आहे. १९८७, १९९९, २००३, २००७, २०१५ या पाच वर्षी ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन ठरला. वेस्टइंडिजने १९७५ आणि १९७९ पहिले २ वर्ल्डकप जिंकले आहेत. १९८३ मध्ये भारताकडून फायलनमध्ये त्यांचा पराभव झाला होता. पाकिस्तानने १९९२ मध्ये तर श्रीलंकेने १९९६ मध्ये वर्ल्डकप जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना अफगानिस्तान सोबत होणार आहे. हा डे-नाईट सामना ब्रिस्टलमध्ये रंगणार आहे.