स्टार क्रिकेटपटूला मोठा धक्का, ICC कडून 9 महिन्यांची बंदी
क्रीडा विश्वातील सर्वात मोठी बातमी | या स्टार खेळाडूवर ICC कडून बंदी
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठी बातमी येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज झुबेर हमजा (Zubayr Hamza) ला डोपिंग विरोधी नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयसीसीने कारवाई केली आहे. क्रिकेटरला 9 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.
Zubayr Hamza ने 17 जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील पार्ल इथे स्पर्धेबाहेरचे दाखले दिले. 22 मार्चमध्ये 2022 पासून त्याच्यावर बंदी लावण्यात आली आहे. त्याला 22 डिसेंबर 2022 पर्यंत सामना खेळता येणार नाही.
17 जानेवारी ते 22 मार्च 2022 पर्यंतची त्याने केलेली कामगिरी चांगली राहिली नाही त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. झुबेर हमजा याने दक्षिण आफ्रिकेसाठी 6 कसोटी सामने आणि एक वन डे सामना खेळला आहे.
26 वर्षीय हमजाची कामगिरी प्रथम श्रेणीमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याने 78 सामन्यांमध्ये 5271 धावा केल्या. यामध्ये त्याने 13 शतकं आणि 26 अर्धशतके केली. 39 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने नाबाद 222 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली.
हमजाने कसोटी सामन्यात त्याने उत्तम कामगिरी केली. 6 कसोटी सामन्यात 212 धावा केल्या. त्याने एक अर्धशतक लावलं. तर वन डे सामन्यात त्याने 56 धावा केल्या. 20 टी 20 सामन्यात 639 धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने आज भारताविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीमची घोषणा केली. यामध्ये आयपीएल खेळणाऱ्या 9 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. अशाप्रकारे चूक केल्यास इतर खेळाडूंवरही कारवाई होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे.