मुंबई : शनिवारी महिला वर्ल्डकप टूर्नामेंटमध्ये भारत विरूद्ध वेस्टइंडिज सामना झाला. या सामन्यात भारतीय महिलांनी वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट टीमचा धुव्वा उडवला. वेस्ट इंडिजवर पराभवाचं दुःख असतानाच आता त्यांना अजून एक मोठा धक्का बसला आहे. आयसीसीने वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट टीमला मोठा झटका दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजच्या महिले क्रिकेट टीमने टीम इंडिया विरूद्ध स्लो ओव्हर रेटने गोलंदाजी केली. यामुळे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वेस्ट इंडिजच्या महिला टीमला दंड ठोठावला आहे.


हॅमिल्टनमध्ये शनिवारी ICC महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल वेस्ट इंडिज महिला टीमला त्यांच्या मॅच फीच्या 40 टक्के दंड ठोठावण्यात आला. ICC एलिट पॅनेलचे सामनाधिकारी शॅंड्रे फ्रिट्झ यांनी स्टेफनी टेलरच्या नेतृत्वाखालील टीमला निर्धारित वेळेत 50 ओव्हर्स टाकण्यात अपयशी झाल्याबद्दल दंड ठोठावलाय. 


यावेळी वेस्ट इंडिज टीमने निर्धारित वेळेपेक्षा 2 ओव्हरने कमी टाकल्या होत्या. अशा परिस्थितीत मॅच रेफरीने त्याच्यावर हा दंड ठोठावला आहे.


कर्णधार स्टेफनी टेलरने हे आरोप स्विकारत शिक्षा मान्य केली आहे. त्यामुळे याप्रकरणी आता कोणतीही सुनावणी होणार नाहीये.