कोलंबो : आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून श्रीलंकेच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. पण कोणत्या सीरिजबाबत चौकशी सुरु झाली आहे हे मात्र आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग श्रीलंकेत जाऊन आल्याचं आयसीसीनं प्रसिद्धी पत्रकात म्हणलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताविरुद्धच्या तीन टेस्ट, पाच वनडे आणि एक टी-20 अशा सगळ्या मॅचमध्ये श्रीलंकेचा पराभव झाला होता. तर झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये श्रीलंकेचा २-३नं पराभव झाला होता.


श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डानं करार झालेल्या ४० खेळाडूंची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आयसीसीनंही चौकशी झाल्याची माहिती दिली आहे. श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती सदस्य प्रमोदया विक्रमसिंगे यांनीही श्रीलंकेच्या पराभवाबाबत संशय व्यक्त केला होता.