ICC made 2 Pitch in Oval India vs Australia WTC Final 2023: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मॅच भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) आजपासून (7 जून 2023) सुरु होत आहे. हा सामना लंडनमधील द ओव्हलच्या मैदानात खेळवणार जाणार आहे. भारतीय संघ काही दिवसांपूर्वीच लंडमध्ये दाखल झाला आहे. दोन्ही संघ या सामन्याआधी कसून सराव करत आहे. दरम्यान या सामन्यापूर्वीच द ओव्हलच्या मैदानावरील खेळपट्टीसंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.


...म्हणून तयार ठेवण्यात आल्यात 2 खेळपट्ट्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार, ओव्हलच्या व्यवस्थापनाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या सामन्यासाठी दोन खेळपट्ट्या तयार केल्या आहे. सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोन खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. आंदोलनामध्ये विरोध प्रदर्शन करणारे लोक खेळपट्टी खराब करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरोखरच आंदोलनी खेळपट्टी खराब केलीच तर दुसऱ्या खेळपट्टीवर सामना खेळवला जाईल. ऐनवेळी गोंधळ उडू नये म्हणूनच दुसरी खेळपट्टीही तयार ठेवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यासंदर्भात बोलताना, "हा सामना एका चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आहे. त्यामुळेच आम्ही सर्व प्रकारच्या शक्यता लक्षात घेऊन पूर्ण तयारी केली आहे. या सामन्याला निकाल लागलाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे," असं म्हटलं आहे.


नेमकं आंदोलन का?


सध्या लंडनमध्ये 'जस्ट स्टॉप ऑइल' आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामध्ये सहभागी झालेले लोक ब्रिटन सरकारच्या तेल आणि गॅस तसेच कोळसा नव्या धोरणाला विरोध करत आहेत. लवकरात लवकर सरकारने या नव्या धोरणाअंतर्गत देण्यात आलेले परवाने रद्द करावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. हेच आंदोलक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यामध्ये खोडा घालू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अधिक सुरक्षाही मैदानाबाहेर पुरवण्यात आल्याचे समजते.


नक्की वाचा >> "निवृत्त होण्याआधी मला..."; World Test Championship च्या Final आधीच Rohit Sharma चं सूचक विधान


क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच


आयसीसीने अतिरिक्त खेळपट्टी तयार ठेवण्याचा निर्णय फार विचाराअंती घेतला आहे. लंडनमधील मैदानात हे आंदोलन घुसखोरी करण्याची शक्यता असल्याने ही तयारी करण्यात आली आहे. क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे दोन खेळपट्ट्या एकाच सामन्यासाठी तयार ठेवण्यात आल्याचा प्रकार घडत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने इतरही तयारी केली आहे. यामध्ये त्यांनी आयसीसीचा नियम 6.4 लागू केला असून या नियमामध्ये सामन्यादरम्यान खेळपट्टी खराब झाल्यास काय करता येईल याबद्दल सांगितलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाला यासंदर्भातील पूर्वसूचना देण्यात आली आहे.