मुंबई: कॅप्टन कूल धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर चेला ऋषभ पंतने आपली टीम इंडियामध्ये जागा तयार केली आहे. मात्र आता टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये कोणकोण असणार यासाठी चर्चा होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ऋषभ पंतने चांगलं प्रदर्शन केलं आहे. ऋषभ पंतची स्पर्धा वाढली आहे याचं कारण म्हणजे टीम इंडियामध्ये 3 विकेटकीपर्स असे आहेत जे ऋषभ पंतसाठी धोक्याचे ठरू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभ पंतची कामगिरी सध्या उत्तम असली तरी टी 20 वर्ल्डकपसाठी तो संघात असणार की त्याचं स्थान डळमळीत होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्याच्यासोबत स्पर्धा करणारे नेमके कोण आहेत जाणून घेऊया. 


ईशान किशन


युवा खेळाडू भारतीय क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीनं जेव्हा संघात आपलं स्थान निश्चित करण्याच्या तयारीत होता तेव्हा त्याच्यासोबत झारखंडचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनही आपली उत्तम कामगिरीने सर्वांची मनं जिंकत होता. ईशान किशनने आयपीएलच्या हंगामातही उत्तम कामगिरी केली आहे. ईशान किशन आपल्या प्रतिभेमुळे टीम इंडियाच्या टीममधील शर्यतीत पुन्हा येण्याची शक्यता आहे. 


ईशान किशनची उत्तम कामगिरी ही ऋषभ पंतसाठी धोक्याची ठरू शकते. कारण यामुळे दोघांपैकी कोणाला संघात घ्यायचं असा प्रश्न आता टीम इंडियाच्या निवड समितीसमोर पडू शकतो. त्यामुळे ईशान किशन ऋषभला टफ देणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. 


संजू सॅमसन


आयपीएलमध्ये यावेळी दोन मॅच चांगला खेळलेल्या संजूनं श्रीलंके विरुद्धच्या सीरिजमध्ये बऱ्यापैकी चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडियाकडे संजू सॅमसन हा पर्याय असू शकतो. त्याने टी 20 मध्ये आपल्या फलंदाजीने आणि विकेटकीपिंगसाठी टीममध्ये आपली जागा तयार करायला सुरुवात केली आहे. हा स्पर्धेत जरी शेवटी असला तरी ऋषभला स्पर्धक म्हणून आहेच. 


के एल राहुल


विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर लिमिटेड ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी के एल राहुलचं नाव समोर येतं. कसोटी क्रिकेटमध्ये जरी आपलं स्थान गमावलं असलं तरी लिमिटेड ओव्हर्समध्ये मात्र के एल राहुलनं आपली कामगिरी उत्तम ठेवली आहे. त्यामुळे ऋषभ पंत आणि के एल राहुल यांच्यात स्पर्धा होऊ शकते. त्यामुळे पंत की के एल राहुल टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाकडून खेळणार हे पाहाणं सर्वांसाठीच औत्सुक्याचं ठरणार आहे.